Suresh Dhas । सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील ( Santosh Deshmukh Murder case ) उर्वरित आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी आज परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांनी भाषणं केली.
भाजपा आमदार सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनीही या सभेत तुफान फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. धनंजय मुंडेंसह त्यांनी अजित पवार ( Ajit Pawar ) यांनाही चांगलाच टोला लगावला आहे.
“संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना मोक्का लागला पाहिजे. त्यांना मोका लागला म्हणजे, चार पाच वर्ष ते काही बाहेर येत नाही. अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेतले. “अजितदादा क्या हुँआ तेरा वादा…आकाच्या आकाला मंत्रिमंडळात का घेतले?”, असा सवाल करत सुरेश धस यांनी मुंडेंसह अजित पवारांनाही लक्ष्य केलं.
“बीड जिल्ह्यातील सर्व हत्या कोणी घडवून आणली? त्याचे रेकॉर्ड पाहा. संदीप दिगुळेपासून संतोष देशमुखापर्यंत हत्येची बेरीज केली तर त्याचा मास्टरमाईंड कोण, कोणी हे उद्योग केले हे तुम्हाला माहीत नसेल तर परभणीला माणसं पाठवा, बारामतीची माणसं पाठवा. इतर समाजाला काय वागणूक मिळते, अठरा पगड जातीला काय वागणूक मिळते?, आमच्या जिल्हा बिन मंत्र्यांच्या राहू द्या. त्यानंतर लोक आनंदी राहतील.”, असं सुरेश धस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Amol Mitkari यांनी केला बजरंग सोनावणे आणि Walmik Karad चा फोटो ट्विट; म्हणाले…
- Manoj Jarange Patil | “…तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही”; मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा
- उद्धव ठाकरे, संजय राऊत, सुप्रिया सुळेंकडून Devendra Fadanvis यांचं कौतूक, भविष्यातील संकेत काय?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now📈 लोकप्रिय बातम्या
Ask Maharashtra Desha
तुमच्या प्रश्नाचे उत्तर आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास Web Search fallback वापरला जाऊ शकतो.












