Share

Maharashtra Politics । महायुतीतील वाद चव्हाट्यावर? भाजपनंतर शिंदे गटाच्या ‘या’ दिग्गज नेत्याने मागितला मुंडे बंधु-भगिनींचा राजीनामा

Maharashtra Politics, After BJP MLA Suresh Dhas, the demand for the resignation of Dhananjay Munde from the Shinde group is getting stronger. Not only this, this leader has also demanded the resignation of minister Pankaja Munde.

by MHD

Published On: 

Maharashtra Politics । मोठी बातमी! भाजपनंतर शिंदे गटाच्या 'या' दिग्गज नेत्याने मागितला मुंडे बंधु-भगिनींचा राजीनामा

🕒 1 min read

Maharashtra Politics । जरी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांची युती असली तरी मागील काही दिवसांपासून युतीमध्ये काहीतरी आलबेल असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याला कारण आहे ते म्हणजे बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण (Santosh Deshmukh murder case). या प्रकरणामुळे अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी महायुतीतील नेते करत आहेत.

भाजप आमदार सुरेश धस यांच्यानंतर आता शिंदे गटातून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. इतकेच नाही तर या नेत्याने मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. यावरून महायुतीमध्ये काहीतरी बिनसलं आहे, अशा चर्चा दबक्या आवाजात सुरु आहेत.

ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी मुंडे बंधु-भगिनींचा राजीनामा मागितला आहे. बीडच्या घटनेनंतर बंधु-भगिनींनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा. मी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम केलं असून जर त्यांना हवं असतं, तर ते अनेक वाल्मिक कराड निर्माण करू शकले असते. पण गोपीनाथ मुंडे असे नेते नव्हते,” असे गजानन किर्तीकर यांनी स्पष्ट केले आहे.

Gajanan Kirtikar on Dhananjay Munde and Pankaja Munde

गजानन किर्तीकर यांच्या मागणीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे काय उत्तर देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!