Share

Amol Kolhe | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिरेटोप नम्रपणे नाकारला, यावर अमोल कोल्हे म्हणाले, “ही कृती अतिशय…”

देवेंद्र फडणवीस यांनी जिरेटोप घालण्यास नम्रपणे नकार दिला. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी मुख्यमंत्र्यांचे भरभरून कौतुक केले आहे.

Published On: 

Amol Kolhe | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिरेटोप नम्रपणे नाकारला, यावर अमोल कोल्हे म्हणाले, "ही कृती अतिशय..."

Amol Kolhe | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी काल पिंपरी चिंचवड मधील देवाची आळंदी येथे जाऊन संत कृतज्ञता कार्यक्रमात हजेरी लावलेली पाहायला मिळाली. यावेळी संतांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन आणि जिरेटोप देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी स्वामी गोविंद गिरी महाराज व तेथील संतांनी देवेंद्र फडणवीस यांना जिरेटोप डोक्यावर परिधान करण्याची विनंती केली.

मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी जिरेटोप घालण्यास नम्रपणे नकार दिला. देवेंद्र फडणवीस यांच्या या कृतीचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी देखील मुख्यमंत्र्यांचे भरभरून कौतुक केले आहे. ही कृती अतिशय स्तुत्य व स्वागतार्ह असल्याचं सांगत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे.

अमोल कोल्हे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात भेट म्हणून देण्यात आलेला जिरेटोप घालण्यास नम्रपणे नकार दिला. जिरेटोपास श्रध्देने वंदन करून योग्य सन्मान केला. ही कृती अतिशय स्तुत्य व स्वागतार्ह आहे. राजकीय मतभेद असले, तरी शिवशंभू विचारांचा पाईक म्हणून ही कृती मनाला भावणारी आहे.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install