Prajakta Mali च्या माफीच्या मागणीवर Suresh Dhas स्पष्टच बोलले; म्हणाले…

Suresh Dhas | भाजपाचे आमदार सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य करत असताना अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचा नामोल्लेख केला होता. यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. परळीत इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सचा वेगळाच परळी पॅटर्न आहे. याठिकाणी मोठ मोठ्या … Read more

Published On: 

Suresh Dhas | प्राजक्ता माळीच्या माफीच्या मागणीवर सुरेश धस स्पष्टच बोलले; म्हणाले...

Suresh Dhas | भाजपाचे आमदार सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य करत असताना अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचा नामोल्लेख केला होता. यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

परळीत इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सचा वेगळाच परळी पॅटर्न आहे. याठिकाणी मोठ मोठ्या सेलिब्रिटी येत असल्याचे सांगून धस यांनी काही महिला कलाकारांची नावे घेतली होती. यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांनी आपली माफी मागावी, अशी मागणी केली होती. आता आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीच्या मागणीवर एका वाक्यात उत्तर देत वक्तव्य करणं टाळलं आहे.

“तो विषय माझ्यासाठी संपलेला आहे, माझी बाजू अनेकांनी मांडली आहे. कृपया संतोष देशमुख हत्याप्रकरणाला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये”, असे म्हणत प्राजक्ता माळींच्या तक्रारीवर अधिक बोलण्यास आमदार सुरेश धस यांनी नकार दिला.

वाल्मिक कराडला अटक करण्यात आली का, याबाबत जोपर्यंत कन्फर्म माहिती सीआयडीकडून येत नाहीत, तोपर्यंत आका आतमध्ये गेलाय का हे मी सांगणार नाही. अद्याप ते आतमध्ये गेल्याची माहिती माझ्याकडे नाही, असेही धस यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या :

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

Journalist at Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही