“तुमचा नेता सुपारी घेतोय आणि तुम्ही…”, संजय राऊत यांचा राज ठाकरेंवर निशाणा

Sanjay Raut vs MNS Raj Thackeray | कोणी अंधारात काही फेकलं असेल तर त्याला शाबासकी देतात, त्याला नामर्दानगी म्हणता? तुमचा नेता सुपारी घेतोय

Published On: 

Sanjay Raut vs Raj Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर ठाण्यात हल्ला करण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या ठाण्याच्या सभेच्या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तुमचा नेता सुपारी घेऊन बसलाय. अन् तुम्ही उगाच राडा करता? असा संताप व्यक्त करतानाच तुमचा राजकीय वापर केला जात आहे. हे लक्षात ठेवा, असा सल्ला संजय राऊत यांनी मनसेच्या कार्यकर्त्याना दिला.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, ”असला प्रकार पुन्हा करू नका. नाही तर गडबड होईल. तुमच्याकडून कोणी तरी हा प्रकार करून घेत आहे. ते अहमद शाह अब्दाली हे सर्व घडवून आणत आहेत. त्यांनी मोठी सुपारी घेतली आहे. तुमचा वापर होत आहे. तुमचा नेता सुपारी घेऊन तुम्हाला मारामाऱ्या करायला लावतो. ते योग्य नाही. तुमच्यासाठीही आणि राज्यासाठीही योग्य नाही आहे. तुमचा वापर होतोय हे लक्षात ठेवा, असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut Vs MNS Raj Thackeray

हे सर्व सुपारी बाज आहेत. कोणती अॅक्शन? काय झालं? रात्रीच्या अंधारात कोणी पाहत नाही हे बघून राडा केला. ही सुपारी गँग आहे. मी कोणत्या पार्टीचं नाव घेत नाही. पण राज्यात अराजकता निर्माण करण्याचं काम सुरू आहे. लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही कधीच राज ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला केला नाही. ती आमच्या पक्षाची भूमिका नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

त्याला नामर्दानगी म्हणता?

कोणी अंधारात काही फेकलं असेल तर त्याला शाबासकी देतात, त्याला नामर्दानगी म्हणता? एवढा मोठा ताफा असतो. त्यावेळी हा प्रकार घडला. मुख्यमंत्र्यांवर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आहे ना? तुम्ही अशी भाषा करता?, असा सवाल करतानाच मराठी माणूस एकमेकांच्या विरोधात लढतोय आणि अहमद शाह अब्दाली टाळ्या वाजवत आहेत, असा हल्लाच राऊत यांनी केला.

काल जो प्रकार झाला. ते कुणाचे कार्यकर्ते होते? ते अहमद शाह अब्दालीचे कार्यकर्ते होते. बीडमध्ये जो प्रकार झाला. राज ठाकरे यांच्या गाडीवर कुणी सुपाऱ्या फेकल्या. त्याचा शिवसेनेशी संबंध नाही. आम्ही त्याप्रकाराशी सहमत नाही. पण काल जो आमच्याकडे काळोखात प्रकार झाला. त्यांना विनंती आहे. असा प्रकार करू नका. तुम्ही या स्तरावर येत असाल तर तुमच्यासाठी ते चांगलं नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही