🕒 1 min read
Vinesh Phogat disqualified : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे. विनेश फोगाटला फायनलसाठी अपात्र घोषित करण्यात आलं आहे. 50 किलो वजनी गटातून विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आलय. विनेशच वजन 50 किलो 100 ग्रॅम पेक्षा जास्त असल्याने तिला अपात्र करण्यात आले आहे.
विनेशने काल 50 किलो वजनी गटातून जगातील अव्वल तीन कुस्तीपटूना हरवून फायलनमध्ये पोहोचली होती. परंतु ऑलिम्पिक नियमानुसार वजनाची जी मर्यादा आहे, त्यापेक्षा विनेशच वजन 50 किलो 100 ग्रॅम पेक्षा जास्त वाढल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले आहे. ऑलिम्पिक नियमानुसार रेसलरला वजनी गटात फक्त 100 ग्रॅम जास्त वजनाची परवानगी दिली जाते. पण विनेशच वजन यापेक्षा जास्त होतं.
Vinesh Phogat disqualified from Paris Olympics 2024 Womens Wrestling
इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने विनेश फोगाटला अयोग्य ठरवण्यात आल्याची माहिती दिली आहे. विनेश फोगाट ओव्हरवेट असल्याने अपात्र ठरवण्यात आलय, असे सांगण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- २४ तासांत आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची राणाभीमदेवी थाटात गर्जना करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी १० वर्षे काय केले?
- ‘शिवसेना’ पक्ष हा उद्धव ठाकरे यांना मिळणार; मोठ्या वकिलाच्या दाव्याने राजकारणात खळबळ
- तुम्ही खरंच प्रबोधनकारांच्या घराण्यात जन्मलात का? राज ठाकरेंच्या घराण्यावर लक्ष्मण हाकेंचा प्रश्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












