Share

राज ठाकरेंनी मराठा समाजाची माफी मागावी; ठाकरेंविरोधात धाराशिवमध्ये मराठा आंदोलक आक्रमक

Maratha Protestors against Raj Thackeray । भेटीला गेलेल्या मराठा आंदोलकांना राज ठाकरेंनी अरेरावी केल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे.

Published On: 

Raj Thackeray Maratha Protestors maratha reservation

Raj Thackeray : धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी राडा घातला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) धाराशिवमध्ये आहेत. ज्या हॉटेलमध्ये राज ठाकरे थांबले होते, त्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलकांनी (Maratha) राडा घातला.

मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) त्यांना राज ठाकरे यांच्याशी चर्चा करायची होती. पण राज ठाकरे यांनी भेट नाकराल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले. जोपर्यंत राज ठाकरे मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली होती.

भेटीला गेलेल्या मराठा आंदोलकांना राज ठाकरेंनी अरेरावी केल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे.

राज ठाकरे काय म्हणाले होते
“बाहेरच्या राज्यांमधून मुलं येतात आणि आपल्या राज्यातील नोकऱ्या बळकावतात. आपल्या राज्यातील शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतात. आपल्या मुला मुलींना मिळत नाही. ठाणे, पुणे, नागपुरात ज्याप्रकारचे फ्लायओव्हर्स, ब्रीज आणि इतर सगळ्या गोष्टी मूळच्या लोकसंख्येसाठी नाही तर बाहेरुन येणाऱ्या लोकांसाठी होतात.

म्हणजे बाहेरुन येणाऱ्या लोकांचा लोंढा किती मोठ्या प्रमाणात आहे. येथे या शहरात आल्यानंतर त्यांची व्यवस्था करण्यात सरकारचा इतका पैसा खर्च होतो. राज्यात इतक्या गोष्टी उपलब्ध असताना महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही. महाराष्ट्रातील मुला मुलींना आधी प्राधान्य द्या आणि उरल्या तर बाहेरच्यांना बोलवा असं मी आधीपासूनच सांगत आहे’ असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

राज ठाकरे यांच्या अटकेची मागणी
राज ठाकरेंवर टाडा लावून अटक करा, राज ठाकरेंची वक्तव्य ही समाज दुभंगण्याची आहेत. समाज दुभंगला की देश दुभंगतो. असं म्हणत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही