Anil Deshmukh VS Sachin Waze । मुंबई पोलीस दलातील बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख पैसे घेत होते असा गंभीर आरोप सचिन वाझे यांनी केला आहे.
सचिन वाझे यांना रात्री वैद्यकीय तपासणीसाठी जे जे रुग्णालयात आणलं होतं. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे धक्कादायक दावे केले आहेत. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांच्या या आरोपामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले Sachin Waze?
अनिल देशमुख हे त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घेत असल्याचे सचिन वाझे यांनी म्हटले आहे. याबाबत सीबीआयकडे संपूर्ण पुरावे देखील आहेत. त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्र लिहून सर्व माहिती दिली असेही सचिन वाझे यांनी म्हटलं आहे. सचिन वाजे यांनी केलेल्या या धक्कादायक आरोपामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुख यांच्यासहित जयंत पाटील यांच्या देखील नावाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासह काही नेत्यांची नावे असल्याची माहिती मिळत आहे. सचिन वाझे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात जयंत पाटील यांच्या विरोधात नेमके काय आरोप आहेत? याबाबत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
महत्वाच्या बातम्या
- महिला सक्षमीकरणामुळेच होईल देश महासत्ता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- ‘अमित शहा हे अहमद शाह अब्दालीचे राजकीय वंशज’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
- अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात Eknath Shinde यांना दाखवले काळे झेंडे













