Share

१० वर्षे काय अंडी उबवली? नरेंद्र मोदींचे भाषण बघताना कीव येते – उद्धव ठाकरे

uddhav thackeray vs narendra modi | मोदींचे भाषण बघताना कीव येते, त्यांना असा नडलो की त्यांना घाम फोडला. १० वर्षे काय अंडी उबवली? असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

Published On: 

uddhav thackeray vs narendra modi | उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या मेळावा घेतला. ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समाचार घेत, मोदींवर सडकून टीका केली.

“भाजप म्हणजे चोर माणसं. राजकारणातील षंढ माणसे. असा नडलो की मोदींना घाम फोडला. मोदींचे भाषण बघताना आता कीव येते. १० वर्षे काय अंडी उबवली?” असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात प्रचारासाठी आलेच पाहिजे. राहिलेली गुर्मीही काढू”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

“आयुष्यातील हे सर्वात मोठे आव्हान. यानंतर आव्हान देणारा कुणी उरला नाही. शिवसेनेची तळपती तलवार आहे. त्यांचे मनसुबे राज्याला भिकारी बनवणारे आहेत”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. “मुंबई ओरबाडताना मी गप्प बसू शकत नाही. आलात तर तोडून टाकू”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“हे व्यापारी आपल्यात फूट पाडत आहेत. एवढे खाताय ते जातंय कुठे? खायला काही मर्यादा आहेत की नाही? धनाढ्य आणि चोऱ्यामाऱ्या करणारे दुबार मतनोंदणी करतायत. उपरी मुंबई वसवायला यांना मतदान करायचे का? यावेळी झोपून राहिलो तर मुंबई उपऱ्यांच्या हातात जाईल. मराठीला प्रवेश नाही म्हणतात. पहिले कानफाट फोडा. गेटआऊट सांगून गुजरातला जायला सांगा. बुटचाटे लाचार खुर्चीसाठी आईवर वार करत आहेत”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install