रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ; खेकड्याचा छळ केल्याचा ‘पेटा इंडिया’चा आरोप

Rohit Pawar । आमदार रोहित पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत जीवंत खेकडा आणला होता. खेकड्याला उलटा लटकवून मंत्री तानाजी सावंत यांच्यावर भ्रष्टचाराचे आरोप केले होते. आरोग्य विभागामध्ये रुग्णवाहिका खरेदीमध्ये ६ हजार कोटींचा घोटाळा मंत्री सावंत यांनी केला असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.  पत्रकार परिषदेत पवारांनी जीवंत खेकडा आणल्यामुळे ते अडचणीत सापडले आहे. खेकड्याला … Read more

Published On: 

Rohit Pawar । आमदार रोहित पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत जीवंत खेकडा आणला होता. खेकड्याला उलटा लटकवून मंत्री तानाजी सावंत यांच्यावर भ्रष्टचाराचे आरोप केले होते.

आरोग्य विभागामध्ये रुग्णवाहिका खरेदीमध्ये ६ हजार कोटींचा घोटाळा मंत्री सावंत यांनी केला असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.  पत्रकार परिषदेत पवारांनी जीवंत खेकडा आणल्यामुळे ते अडचणीत सापडले आहे.

खेकड्याला दोरीने लटकवल्याने त्याचा छळ झाल्याचा आरोप ‘पेटा इंडिया’ संस्थेने केला असून या प्रकरणी आमदार रोहित पवार यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी ‘पेटा’ने शरद पवार व उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांना पत्र पाठवले आहे.

खेकड्याला पशुवैद्यकीय सेवा आणि पुन्हा निसर्गात पुनर्वसन करण्यासाठी खेकड्याला त्यांच्याकडे देण्याची मागणी देखील ‘पेटा’ने केली आहे.

‘पेटा इंडिया’चे कायदेविषयक सल्लागार विभागाचे शौर्य अग्रवाल यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, खेकड्याचा केलेला वापर हा पूर्वनियोजित असून हे व्हिडिओवरून स्पष्ट दिसते आहे. राजकीय प्रसिद्धीसाठी त्यांनी खेकड्याला दुखवले आहे. हे गैरप्रकार थांबविण्यासाठी रोहित पावर यांच्या विरोधात तक्रार करत असल्याचे अग्रवाल यांनी म्हंटले आहे.

प्रचारात प्राण्यांचा वापर करण्यास मनाई

निवडणूक प्रचार करतांना महाराष्ट्र आदर्श आचारसंहितेनुसार प्राण्यांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे तसे आदेश मुख्य निवडणूक कार्यालयाने २४ मार्च २०२४ रोजी काढला आहे. निवडणूक आयोगाने आदर्श आचासंहितेबाबत केलेली नियमावली तसेच  १९ सप्टेंबर २०१२ रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेले परीपत्र या नुसार आमदार रोहित पवार यांनी  प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० चे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाईची  मागणी ‘पेटा इंडिया’ने केली आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही