Explained । भावाची सावली हरवली; बारामतीत सुप्रिया सुळे वहिनीसमोर कशा टिकणार?

Baramati Lok Sabha Elections 2024 Sunetra Ajit Pawar Vs Supriya Sule Sharad Pawar

Ajit Pawar vs Supriya Sule पुणे – राज्यातील सर्वाधिक लक्ष लागुन असलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या सुनेत्रा अजित पवार (Sunetra Pawar) यांच्या लढतीकडे लागले आहे. अजित पवार यांनी केवळ आपल्या लोकसभा मतदार संघात दौरे वाढवले असुन प्रचारात रंगत आणली आहे. दुसरीकडे सुप्रिया सुळे या मात्र, सध्यातरी शांततेत प्रचार करीत असल्याचे पाहायला मिळत आहे.

बारामती हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. या मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, खडकवासला अशा ६ विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

शरद पवारांनी १९९६ पासून हा गड अजिंक्य ठेवला आहे. येथे पवार कुटुंबा व्यतिरिक्त कुणीही निवडून आलेले नाही. यावेळी मात्र परिस्थिती बदललेली आहे. आता बारामती लोकसभेची (Lok Sabha Elections 2024) लढाई अन्य उमेदवाराविरुध्द नसुन कुटूंबातच म्हणजे नणंद विरुध्द भावजयीत रंगणार आहे.

राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर अजित पवारांना कुटूंबातूनच सख्खाभाऊ, सख्खा पुतण्या विरोध करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच इंदापुरात हर्षवर्धन पाटील, पुरंदरमध्ये विजय शिवतारे, संग्राम थोपटे, राहुल कुल, संजय जगताप शड्डू ठोकून उभे आहेत. यापैकी विजय शिवतारे यांचा काहीसा विरोध मावळलाचे चित्र सध्या तरी आहे.

असे असले तरी अजित पवार यांचा बारामती लोकसभा मदारसंघात असलेला सामान्य जनतेशी जनसंपर्क हा खूप दांडगा आहे. शिवाय प्रत्येक गावातील कार्यकत्यांशी थेट संपर्क आहे. दुसरीकडे सुप्रिया सुळे यांचा मात्र गावातील कार्यकर्त्यांशी संपर्क नाही. सुळे यांना राज्य पातळीवरील नेत्यांना साकडे घालत प्रचाराला निमंत्रित करावे लागते आहे.

अजित पवारांच्या सावलीत असल्याने सुप्रिया सुळेंना (Supriya Sule )  बारामती लोकसभा मतदार संघात जास्त मेहनत घेण्याची गरज पडायची नाही. मात्र, आता चित्र बदललेले आहे. अजित पवार आता सुप्रिया सुळे यांच्याविरोधात प्रचार करत आहेत. त्यामुळे सुळेंना ही निवडणूक पाहिजे तेव्हढी सोपी जाणार नसल्याचे चित्र आहे.

सुप्रिया सुळे यांना अनेकदा अजित पवारांबद्दल बोलतांना भावनिक झालेले आपण पहिले पण अजित पवारांनी भावनिक राजकारणाला थारा न देता सुळे यांची मिमीक्री करत टीका सुरु ठेवली आहे.

शरद पवारांची जादूची कांडी फिरली तर…

शरद पवार १९९६ ते २००९ हे बारामती लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यानंतर २००९ ते आजपर्यंत (२०२४) सुप्रिया सुळे या तेथील खासदार आहेत. महाराष्ट्रातील धुरा अजित पवारांनी हातात घेतल्यानंतर पवारांनी ( Sharad Pawar ) राज्यातील लक्ष कमी करून आपले लक्ष दिल्लीत केंद्रित केले होते.

पण २०१४ नंतर भाजप सरकार आल्यानंतर पवारांना पुन्हा राज्यात सक्रिय व्हावे लागले. पवारांनी वेळोवेळी भाजपला छुप्या पद्दतीने मदत केलेली आहे. २०१४, २०१७ आणि २०१९ ला भाजप सोबत सत्तेत सहभागी होण्याचा शरद पवारांचा डाव होता, असा आरोप खुद्द पुतणे तथा राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांनीच केलेला आहे.

शरद पवारांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहेच, पण त्यामुळे अजित पवारांचा भाजपासोबत जाण्याचा निर्णय स्वागतार्ह ठरलेला नाही. भाजपासोबत गेल्याने अजित पवारांवर प्रचंड प्रमाणात टीका होत आहे. अशी टीका अजित पवारांवर यापूर्वी कधीही झाली नव्हती. एव्हाना २०१९ ला भाजपासोबत जाऊन उप-मुख्यमंत्रीपदाची शप्पथ घेतली तरी एवढ्या प्रमाणात टीका झाली नव्हती. त्याउलट अजित पवारांना (Ajit Pawar ) महाविकास आघाडीत उप-मुख्यमंत्री पदाची बक्षिसी मिळाली होती.

शरद पवारांनी २०१४ ला सुप्रिया सुळे खासदार व्हाव्यात, म्हणून नरेंद्र मोदी यांना साकडे घातले असल्याचा दावा रासपचे नेते महादेव जानकर करतात. त्यामुळे या निवडणुकीतही पवार कोणती खेळी करून अजित पवारांना क्लीन बोल्ड करतील ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बारामतीत अजित पवार हे सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांची कोंडी करू पाहत असले तरी शरद पवार यांनी त्यांना बारामतीमध्येच रोखले आहे. पत्नीच्या प्रचारात कुठलीही कमतरता राहू नये, यासाठी अजित पवार बारामतीत गुंतून पडले आहेत. त्यामुळे महायुतीच्या अन्य उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांना वेळ काढणे तेवढे शक्य होत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

शिवाय महायुतीचे खंडीभर नेते प्रचारासाठी बारामतीत बोलावले जात आहेत. या प्रचारसभेत मंचावर दिसणारे अजित पवारांना खरंच ‘साथ’ देणार की आतून ‘लाथ’ याबद्दलही चर्चा आहे. दुसरीकडे शरद पवार ( Sharad Pawar ) आपल्या मुलीसाठी कोणता आणि कसा डाव टाकतात, याची सर्वांना उत्सुकता आहे.

ज्यावेळी शरद पवार कामाला लागतात त्यावेळी विरोधकांना भीती वाटते. मात्र, जेव्हा ते शांत असतात तेव्हा आणखी जास्त भीती वाटते. त्यामुळे त्यांच्या हालचालीवर अजित पवार लक्ष ठेवुन आहेत. राज्यातील महत्त्वाच्या लक्षवेधी ठरणाऱ्या या लोकसभा मतदारसंघात येत्या काही दिवसात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळतील, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

संकल्पना / लेखक – मनोज जाधव

सह-लेखक – राजेभाऊ मोगल 

Baramati Lok Sabha Elections 2024 Sunetra Ajit Pawar Vs Supriya Sule

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.