Car loan पुणे : महागडी मोटार खरेदीसाठी बँकेकडे बनावट कागदपत्रांद्वारे १८ लाखांचे कर्ज प्रकरण सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी चैतन्य श्रीकांत नाईक विरुद्ध गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी चैतन्य श्रीकांत नाईक (रा. तुकाईनगर, वडगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दीपाली बाळकृष्ण आठल्ये (वय ४३, रा. सिंहगड रस्ता) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नाईकने महागडी मोटार खरेदीसाठी एका वाहन विक्री दालनाच्या नावे सिंहगड रस्त्यावरील विद्या सहकारी बँके शाखेत कर्जप्रकरण सादर केले होते. नाईकने बँकेकडून १८ लाख ४० हजार रुपयांचे कर्ज मागितले होते. बँकेने त्याला वाहन कर्जापोटी १८ लाख रुपये मंजूर केले.
त्यानंतर त्याने कल्याणीनगर येथील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत बनावट नावाने खाते उघडून मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम जमा केली. बँकेला स्काय मोटो अॅटोमोबाइलच्या नावे बनावट पावती दिली.
महत्वाच्या बातम्या
- जिल्हाधिकाऱ्यांचा दीपक केसरकरांना दणका; गुन्हेगारी पार्श्वभूमी व्यक्तींना पिस्तूल जमा करण्याचे आदेश
- “माझा नेता संधीसाधू, लेचापेचा, पलटूराम निघाला; विजय शिवतारेंना कार्यकर्त्यांनी लिहिले खरमरीत पत्र
- पुणे : आयटी पार्क परिसरात बिबट्याचा वावर











