🕒 1 min read
Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती.
24 ऑक्टोबर 2023 रोजी ही मुदत संपलेली असून मनोज जरांगे (Manoj Jarange) पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषणाला बसले आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक गावात मराठा समाजाने पुढाऱ्यांसाठी गावबंदी केली आहे. बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये बहुतांश गावात गावबंदीचे फलक झळकले आहे.
याच पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी गावबंदी हा पर्याय नसल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.
Abdul Sattar commented on Maratha Reservation
प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना अब्दुल सत्तार म्हणाले, “गावबंदी करणं हा पर्याय असू शकत नाही. कारण कुणाला कुठं सुख-दुःख, लग्न-कार्यासाठी जावं लागू शकतं, काही सांगता येत नाही.
त्याचबरोबर अनेकांना बऱ्याच गावांमध्ये विकास कामाच्या उद्घाटनांसाठी जावं लागतं. गावांमध्ये जाऊन जर आम्ही राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही त्यावर तुम्ही बोलू शकतात.
परंतु, काही सामाजिक कार्यांसाठी सर्वांना उपस्थित राहावं लागत. या कामांसाठी उपस्थित राहणं हे लोकप्रतिनिधींचं काम आहे. त्यामुळे माझी मराठा समाजाला (Maratha Reservation) हात जोडून विनंती आहे की त्यांनी अशा पद्धतीचा निर्णय घेऊ नये.”
Chitangrao Kadam resigned for Maratha reservation
दरम्यान, मराठा आंदोलनाचा मुद्दा चर्चेत असताना मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) शिंदे गटातील नेत्याने राजीनामा दिला आहे.
यवतमाळच्या शिंदे गटाच्या सहसंपर्कप्रमुख चितांगराव कदम यांनी राजीनामा दिला आहे. मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मी राज्य शासनासोबत काम करणार नसल्याचं कदम यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | मनोज जरांगेंचे लाड थांबवले नाही तर मी उपोषण करेल; गुणरत्न सदावर्ते आक्रमक
- Maratha Reservation | स्वतःची ओबीसीतून सोय करणारे राधाकृष्ण विखे पाटलांचा मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध
- Maratha Reservation | मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं; आरक्षणासाठी शिंदे गटातील नेत्यांने दिला राजीनामा
- Maratha Reservation | PM मोदी आज शिर्डी दौऱ्यावर; मराठा समाज अडवणार मोदींचा ताफा?
- Manoj Jarange | मराठ्यांनी त्या श्रद्धेयांना खूप मोठं केलंय; मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा फडणवीसांचे कान टोचले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











