Share

Weather Update | ऑक्टोबर हिटपासून मिळणार दिलासा; थंडीची चाहूल लागण्याचा हवामान खात्याने दिला अंदाज

🕒 1 min readWeather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. राज्यातून मान्सूनने लवकर माघार घेतल्यामुळे ऑक्टोबर हिटचा तडाका बसायला सुरुवात झाली. वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले होते. अशात हवामान खात्याने नागरिकांना दिलासादायक माहिती दिली आहे. राज्यातील हवामानात बदल होणार असून नागरिकांना लवकरच उन्हापासून दिलासा मिळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला … Read more

Published On: 

🕒 1 min read

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. राज्यातून मान्सूनने लवकर माघार घेतल्यामुळे ऑक्टोबर हिटचा तडाका बसायला सुरुवात झाली. वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले होते.

अशात हवामान खात्याने नागरिकांना दिलासादायक माहिती दिली आहे. राज्यातील हवामानात बदल होणार असून नागरिकांना लवकरच उन्हापासून दिलासा मिळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. येत्या काही दिवसांमध्ये राज्यात थंडीची चाहूल लागणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे.

The heat will reduce in the state

राज्यामध्ये उन्हाचा तडाखा कमी होणार असून थंडीची चाहूल लागणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला (Weather Update) आहे. राज्यातील तापमानात हळूहळू घट होताना दिसणार आहे.

परिणामी थंडीची चाहूल लागणार आहे. पुणे आणि मुंबई शहराच्या तापमानामध्ये घट होताना दिसत आहे. त्याचबरोबर राज्यातील बहुतांश शहरांचं तापमान कमी होताना दिसत आहे.

तर दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये ऑक्टोबर हिटचा कहर कमी झाला नसला तरी पहाटे आणि रात्री थंडी जाणवायला लागली आहे.

दरम्यान, अरबी समुद्रामध्ये तेज नावाचा चक्रीवादळ तयार झाल्यामुळे देशातील वातावरणात बदल होणार आहे. येत्या तीन दिवसात केरळमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे.

तर पश्चिम बंगाल, केरळ, ओडिसा, पंजाब, हरियाणा, मिझोराम, नागालँड, बिहार, उत्तर प्रदेशमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काही खास परिणाम होणार नसल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!