Share

Pankaja Munde | दसरा मेळाव्याआधी पंकजा मुंडेंचे झळकले भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर

🕒 1 min readPankaja Munde | बीड: आज देशभरात दसरा साजरा केला जात आहे. दसऱ्याच्या दिवशी मेळावा घ्यायची शिवसेनेचे परंपरा आहे. शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर दोन्ही गटांकडून ही परंपरा जपली जात आहे. यंदा शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे गटाचा तर आझाद मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. तर दुसरीकडे परळीतील भगवान भक्ती गडावर पंकजा … Read more

Published On: 

🕒 1 min read

Pankaja Munde | बीड: आज देशभरात दसरा साजरा केला जात आहे. दसऱ्याच्या दिवशी मेळावा घ्यायची शिवसेनेचे परंपरा आहे. शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर दोन्ही गटांकडून ही परंपरा जपली जात आहे.

यंदा शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे गटाचा तर आझाद मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. तर दुसरीकडे परळीतील भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होणार आहे.

तत्पूर्वी पंकजा मुंडे यांच्या नावाचे सर्वत्र बॅनर झळकले आहे. या बॅनरवर त्यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे. या बॅनर्सनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Pankaja Munde’s Shiv Shakti Parikrama Yatra has just ended

पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा नुकतीच समाप्त झाली आहे. यानंतर त्या परळीतील भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा घेणार आहे.

त्यांच्या या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना मेळाव्यापूर्वी एका बॅनरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आमच्या सीएम तुम्हीच आहात, क्राउड मास्टर ताईसाहेब, असं या बॅनरवर नमूद करण्यात आलं आहे. या बॅनर्सनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी राज्यात दोन मिळावे होतात. परंतु, यावर्षी राज्यात चार दसरा मेळावे होणार आहे. यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “राज्यामध्ये कितीही मिळावे होऊ शकतात.

परंतु, मी फक्त माझ्या मेळाव्यावर लक्ष देणार आहे. आपल्याकडे लोकशाही आहे. त्यामुळे कितीही मिळावे होऊ शकतात. जो तो त्यांचा विषय आहे.”

भारतीय जनता पक्षाने पंकजा मुंडे यांना डावरलं असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. अशात आज दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडे नक्की काय भूमिका स्पष्ट करणार? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!