🕒 1 min read
राजेभाऊ मोगल | छत्रपती संभाजीनगर | Devendra Fadnavis : टीव्हीवर सतत बोलणाऱ्यांची देखील तपासणी झाली पाहिजे. या माध्यमातून त्यांना मानसोपचार तज्ञाकडे पाठवायचे की पागल खाण्यात पाठवायचे याची तपासणी झाली, तरच तुम्ही खरे आरोग्य दूत ठराल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता.१३) विरोधकांवर जोरदार प्रहार केला.
छत्रपती संभाजीनगर येथील अयोध्यानगरी मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, गोरगरिबांना मोफत उपचार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. त्याच अनुषंगाने हे शिबिर घेतले जात आहे. या शिबिरात गरीब वंचित असलेल्या रुग्णांची तपासणी होणार आहे.
मात्र, यासोबतच टीव्ही समोर सतत बडबड करणाऱ्या काही जणांची देखील तपासणी करणे गरजेचे आहे. या तपासणीच्या माध्यमातून त्यांना मानसोपचार तज्ञाकडे पाठवायचे की पागल खाण्यात पाठवायचे? याचे निदान देखील व्हायला हवे, अशी टोलेबाजी विरोधकांचे नाव न घेता त्यांनी केली.
यावेळी मंचावर भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकारी विजया रहाटकर, ज्येष्ठनेते हरिभाऊ बागडे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री अतुल सावे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आ. हरिभाऊ राठोड, आ. संजय शिरसाठ, आ. प्रशांत बंब, आ. नारायण कुचे, संजय केणेकर, विभागीय आयुक्त मधुकर आर्दड, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मिना, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपमुख्यकार्यकारी अधिकारी भोकरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दयानंद मोतीपवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ.पारस मंडलेचा तसेच मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक येथून खास महाशिबिरासाठी आलेले नामांकीत डॉक्टर्स आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक शिबिराचे संयोजक राजेंद्र साबळे पाटील यांनी केले. रामेश्वर नाईक यांनीही या आयोजनाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. शिरिष बोराळकर यांनी आभार प्रदर्शन केले.
महत्वाच्या बातम्या
- Job opportunity | महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळात (MIDC) नोकरीची संधी! आजच करा अर्ज
- Uddhav Thackeray | “सत्ताधाऱ्यांच्या नकली हिंदुत्वाच्या वरवंट्याखाली…”; स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- Rohit Pawar | शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “ही भाजपची रणनीती…”
- Bacchu Kadu | “…म्हणून मुख्यमंत्री शिंदे गावी गेले”; बच्चू कडूंचं खळबळजनक विधान
- Aditya Thackeray | भाजपची उद्धव ठाकरे गटाला ऑफर? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











