Share

Eknath Shinde | शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरणार? राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

Eknath Shinde | नवी दिल्ली: एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयावर लवकरात लवकर सुनावणी व्हावी, यासाठी ठाकरे गटांनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना सुप्रीम कोर्टानं नोटीस पाठवली आहे. Sunil Prabhu had filed a petition in the Supreme Court … Read more

Published On: 

Eknath Shinde | नवी दिल्ली: एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयावर लवकरात लवकर सुनावणी व्हावी, यासाठी ठाकरे गटांनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना सुप्रीम कोर्टानं नोटीस पाठवली आहे.

Sunil Prabhu had filed a petition in the Supreme Court

11 मे रोजी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागला होता. यामध्ये सुप्रीम कोर्टानं 16 आमदारांच्या (Eknath Shinde) अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला होता. मात्र, अद्यापही आमदारांच्या अपात्रतेबाबत कारवाई झाली नाही. त्यामुळं ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

16 आमदारांच्या (Eknath Shinde) निलंबनाबाबत विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेची आज सुनावणी झाली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठांसमोर ही सुनावणी पार पडली.

या खंडपीठात न्यायमूर्ती सिम्हा आणि न्या. मिश्ना यांचा समावेश होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दोन आठवड्यात लेखी उत्तर द्यावं, अशी नोटीस सुप्रीम कोर्टानं नार्वेकरांना बजावली आहे.

दरम्यान, राहुल नार्वेकर यांनी शिंदे गट (Eknath Shinde) आणि ठाकरे गटातील आमदारांना नोटीस पाठवली होती. या नोटीसचं उत्तर देण्यासाठी नार्वेकरांनी आमदारांना 07 दिवसांचा वेळ दिला होता. परंतु शिंदे गटातील आमदारांनी उत्तर देण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install