Share

Sudhir Mungantiwar | राष्ट्रवादीची अवस्था ‘शोले’सारखी झाली आहे, आधे इधर आधे उधर – सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार राज्य सरकारमध्ये सामील झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. Nationalist Congress party has no MLA – Sudhir Mungantiwar  माध्यमांशी बोलत असताना सुधीर … Read more

Published On: 

Sudhir Mungantiwar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार राज्य सरकारमध्ये सामील झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

Nationalist Congress party has no MLA – Sudhir Mungantiwar 

माध्यमांशी बोलत असताना सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, “ही काय पोखरानची गुप्त चाचणी आहे का? जर तुमच्यासोबत (शरद पवार) आमदार असतील तर पत्रकार परिषद घ्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आमदार नाही. राष्ट्रवादीकडे आमदार असते तर त्यांनी ताबडतोब पत्रकार परिषद घेऊन सर्वांना उपस्थित केलं असतं. मात्र, आज त्यांच्याकडे आमदार नाही.

पुढे बोलताना ते (Sudhir Mungantiwar) म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अवस्था शोले चित्रपटासारखी झाली आहे. आधे इधर आधे उधर, हम अकेले. राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांना माननीय मोदी साहेबांच्या (Narendra Modi) नेतृत्वाखाली काम करायची इच्छा होती.”

“राहुल गांधी अमेरिकेत जाऊन भारताची बदनामी करत आहे. आपल्या कुटुंबात एखाद्या सदस्यात काही कमी असेल तर आपण ते गावभर जाऊन सांगत नाही. मात्र, राहुल गांधी अमेरिकेत जाऊन देशाची बदनामी करत आहे. अशा नेत्याला देशाचं प्रधानमंत्री करायचं? हे अशक्य आहे”, असही ते (Sudhir Mungantiwar) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install