🕒 1 min read
Sanjay Raut | दिल्ली: काल (2 जुलै) राज्याच्या राजकारणात मोठी घटना घडली आहे. अजित पवार (Ajit Pawar) हे 40 आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. यावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवारांना धारेवर धरलं आहे.
Ajit Pawar has made a record of swearing in as Deputy Chief Minister – Sanjay Raut
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “अजित पवारांचं हे नियोजन, आयोजन, प्रयोजन फक्त उपमुख्यमंत्री पदासाठी नाही. अजित पवार यांच्या या निर्णयाचे परिणाम राज्यातील राजकारणावर मोठ्या प्रमाणात झाले आहे. अजित पवार यांनी आत्तापर्यंत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा विक्रम केला आहे. तब्बल पाच वेळा त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मात्र, यावेळी त्यांचं डील उपमुख्यमंत्री नाही तर मुख्यमंत्री पदासाठी आहे.
पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “सध्याचे मुख्यमंत्री घरी जाणार आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांचे 16 आमदार 100% अपात्र ठरणार आहे. त्यांची दिल्लीतील शक्ती देखील त्यांना आता वाचवू शकत नाही. अजित पवारांच्या माध्यमातून भाजपने ही पुढची व्यवस्था करून ठेवली आहे. अजित पवार यांना पुढचं मुख्यमंत्री पद देण्याचं काम झालं आहे.”
“विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून आम्हाला काही अपेक्षा नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला अपेक्षा आहे. परंतु शिवसेनेच्या फुटीसंदर्भात जो निर्णय घेतला आहे, तोच निर्णय काल झालेल्या घटनेला लागू होतो”, असही ते (Sanjay Raut) यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीसांचा पोपट झाला, राज्याला मिळणार नवा मुख्यमंत्री; ठाकरे गटाची भविष्यवाणी
- Chitra Wagh | “प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे गिधाड तुम्ही…”; चित्रा वाघांचा संजय राऊतांवर घणाघात
- Sanjay Shirsat | बाळासाहेब ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना लाथ मारून घराबाहेर काढलं असतं – संजय शिरसाट
- Sanjay Raut | देवेंद्रजी राजकीय उखाळ्या पाखळ्या कमी करा, जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्या; ‘त्या’ व्हिडिओवरून संजय राऊतांची फडणवीसांवर टीका
- Ashish Shelar | समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातामुळं भाजप आणि महायुतीचं ‘आक्रोश आंदोलन’ रद्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











