Shinde Group | ठाकरे गटाला रामराम ठोकत ‘हा’ नेता झाला शिंदे गटात सामील

Shinde Group | मुंबई: शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी आज एक सूचक ट्विट केलं होतं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचा आणखीन एक मोहरा कमी होणार असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. Sanjay Agaldareya has entered the Shinde group नरेश मस्के यांच्या ट्विटनंतर महत्त्वाची माहिती … Read more

Published On: 

Shinde Group | मुंबई: शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी आज एक सूचक ट्विट केलं होतं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचा आणखीन एक मोहरा कमी होणार असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.

Sanjay Agaldareya has entered the Shinde group

नरेश मस्के यांच्या ट्विटनंतर महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटातील एका नेत्यांनं  शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला आहे. शिंदे गटात प्रवेश करणारा हा नेता अनिल परब (Anil Parab) यांच्या जवळचा व्यक्ती असल्यास म्हटलं जात आहे. संजय अगलदरे (Sanjay Agaldare) या नेत्यानं  शिंदे गटात प्रवेश केला आहे.

संजय अगलदरे (Sanjay Agaldare) हे तीन वेळा नगरसेवक राहिले आहेत. त्यांनी 2 वेळा खार दांडा आणि 1 वेळा वरळी या ठिकाणी नगरसेवक पद भूषवले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वर्षा निवासस्थानी त्यांनी पक्षप्रवेश (Shinde Group) केला आहे.

पक्षप्रवेश करताना संजय अगलदरे म्हणाले, “शिंदे-फडणवीस सरकार आलं आणि चांगल्या कामांना सुरुवात झाली. या सरकारनं अनेक चांगल्या सेवा दिल्या आहेत. बाळासाहेबांचं  हिंदुत्वाचं सरकार (Shinde Group) स्थापन झाल्यानंतर अनेक थांबलेली विकास काम पुन्हा नव्यानं सुरू झाली आहेत.”

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही