Chitra Wagh | मुंबई: मुंबईत शिवसेनेच्या शाखेवर कारवाई करत असताना बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) फोटोवर हातोडा मारल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. या प्रकरणावरून संतप्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना मारहाण केली आहे. या प्रकरणावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अनिल परब (Anil Parab) यांच्यावर निशाणा साधला आहे.
पालिका अधिकारी मारहाण प्रकरणावरून चित्र वाघ यांनी अनिल परब यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. अनिल परब यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करायला पाहिजे, असं चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करत म्हटलं आहे.
Police should take strict action against Anil Parab – Chitra Wagh
“अनिल परबांची “रस्सी जल गई, पर बल नही गया !” कायदेतज्ञ ॲड अनिल परबांनी कायद्याला न जुमानता महापालिका कार्यालयात घुसून अधिकाऱ्यांना मारहाण केली… अशा माजोरड्या वृत्तीचा निषेध करायलाच पाहीजे. अधिकाऱ्यां मारहाण करण्याचा चुकीचा पायंडा ठाकरेंकडून पाडला जातोय. अनिल परबांवर पोलिसांनी कडक कारवाई करायला पाहिजे”, असं चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करत म्हटलं आहे.
अनिल परबांची “रस्सी जल गई, पर बल नही गया !”
कायदेतज्ञ ॲड अनिल परबांनी कायद्याला न जुमानता महापालिका कार्यालयात घुसून अधिकाऱ्यांना मारहाण केली…
अशा माजोरड्या वृत्तीचा निषेध करायलाच पाहीजे. अधिकाऱ्यां मारहाण करण्याचा चुकीचा पायंडा ठाकरेंकडून पाडला जातोय.
अनिल परबांवर…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 27, 2023
दरम्यान, काल (26 जुन) ठाकरे गटाकडून सांताक्रुज येथे मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी बोलत असताना अनिल परब म्हणाले, “पोलिसांसोबत आमचं काही भांडण नाही. त्यामुळे पोलिसांच्या ताकदीवर आमच्याशी लढू नका. मी अजूनही आमदार आहे, हे विसरू नका.”
महत्वाच्या बातम्या
- Jayant Patil | मुख्यमंत्र्यांच्या हुकूमशाहीला महाराष्ट्रात जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही – जयंत पाटील
- ODI World Cup | वनडे वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! जाणून घ्या सविस्तर
- Ambadas Danve | खत, बियाणे डबलचा भाव, शेतकऱ्यांना मदत अर्धीच करता राव; अंबादास दानवेंचं सरकारवर टीकास्त्र
- Sanjay Raut | बाळासाहेबांच्या फोटोला हातोडा मारण्याचे आदेश ‘वर्षा’वरून आले – संजय राऊत
- Thackeray Group | आज ‘उबाठा’चा आणखी एक मोहरा कमी होईल; शिवसेना नेत्याचा दावा