Sanjay Raut | बाळासाहेबांच्या फोटोला हातोडा मारण्याचे आदेश ‘वर्षा’वरून आले – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: सध्या मुंबईतील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. शाखा पाडताना बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) फोटोला हातोडा मारला गेल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडे मारले जात आहेत, हे त्या शिवसैनिकांना कळलं नाही. तर हे कसले शिवसैनिक? त्यांनी शिवसेनेचं नाव घेऊ नये, कारण ते नकलीच राहणार आहे. बाळासाहेबांच्या फोटोला हातोडे मारण्याचे आदेश वर्षा बंगल्यावरून आले होते. तुम्ही शाखा आणि बाळासाहेबांचे फोटो तोडायला लावले. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. हा नीचपणा आहे.”

You have got the post of Chief Minister of the state in the name of Balasaheb Thackeray – Sanjay Raut

“ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्या नावामुळे तुम्ही आतापर्यंत जगला आहात, वाढला आहात. बाळासाहेबांच्या नावावर तुम्हाला राज्याचं मुख्यमंत्रीपद मिळालं आहे. त्या बाळासाहेबांच्या फोटोवर तुम्ही हातोडे मारण्याचे आदेश देत आहे”, असही ते (Sanjay Raut) म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.