Thackeray Group | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होते. अशात शिंदे गटाच्या एका नेत्यांनं सूचक ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Another leader of the Uddhav Thackeray group will join the real Shivsena – Naresh Maske
शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Maske) यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. उद्धव ठाकरे गटाचा (Thackeray Group) आणखीन एक मोहरा खऱ्या शिवसेनेत येणार असल्याचं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या ट्विट नंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत.
ट्विट करत नरेश मस्के म्हणाले, “आज ‘उबाठा’चा आणखी
एक मोहरा कमी होईल
खऱ्या शिवसेनेत येऊन
विचारांशी निष्ठा ठेवील
नाहीच राहू शकत तिथे
खरे कार्यकर्ते आता
स्मशान शांतता पसरणार तिकडे
मारोत कुणी काही बाता
सुपडा साफ होणार आणि
तुमचे उखळ पांढरे होणार
‘उठा’ तुमच्यावर लवकरच
झोपायची वेळ येणार
ED चा फेरा ठेपलाच आहे
येऊन तुमच्या दारी
म्यान करून ठेवा
तुमच्या गंजल्या तलवारी”
आज 'उबाठा'चा आणखी
एक मोहरा कमी होईल
खऱ्या शिवसेनेत येऊन
विचारांशी निष्ठा ठेवीलनाहीच राहू शकत तिथे
खरे कार्यकर्ते आता
स्मशान शांतता पसरणार तिकडे
मारोत कुणी काही बातासुपडा साफ होणार आणि
तुमचे उखळ पांढरे होणार
'उठा' तुमच्यावर लवकरच
झोपायची वेळ येणारED चा फेरा ठेपलाच आहे… pic.twitter.com/5PwBC1nsQk
— Naresh Mhaske (@nareshmhaske) June 27, 2023
दरम्यान, नरेश म्हस्के यांच्या या ट्विट नंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या या ट्विटनंतर ठाकरे गटातील (Thackeray Group) नेमका कोणता नेता शिंदे गटात जाणार? असा सवाल उपस्थित झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Pune Crime | पुणेकरांनो सावधान! पुण्यात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड
- Eknath Shinde | पहिल्याच पावसात सरकार वाहून गेले; ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात
- ODI World Cup | आज होणार वनडे वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! IND vs PAK सामन्याकडं सर्वांचं लक्षं
- Nana Patole – पंढरीची वारी आस्थेचा, श्रद्धेचा विषय; केसीआरनी राजकीय फायदा उठवू नये
- Prakash Ambedkar | “… म्हणून मी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली; प्रकाश आंबेडकरांचं स्पष्टीकरण