Share

Chitra Wagh | “मोठ्या ताई अफवा पसरवू नका, काविळ झालेल्यांना जग पिवळं दिसतं तसं तुमचं..”; चित्रा वाघांची सुप्रिया सुळेंवर टीका

Chitra Wagh | मुंबई: मुंबई लोकलमध्ये चालू गाडीत महिला डब्यात तरुणीवर बलात्कार झाल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून दिली होती. त्याचबरोबर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नसून याला गृहखात्याची निष्क्रियता कारणीभूत आहे, असं सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हटलं होतं. त्यांच्या या टीकेला भाजप … Read more

Published On: 

Chitra Wagh | मुंबई: मुंबई लोकलमध्ये चालू गाडीत महिला डब्यात तरुणीवर बलात्कार झाल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून दिली होती. त्याचबरोबर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नसून याला गृहखात्याची निष्क्रियता कारणीभूत आहे, असं सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हटलं होतं. त्यांच्या या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करत सुप्रिया सुळे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. लोकलमध्ये महिलेवर बलात्कार झाल्याचं एवढं मोठं स्टेटमेंट करण्याआधी मोठ्ठ्या ताईंनी थोडी शहानिशा तरी करायला हवी होती, असं चित्रा वाघ यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

Chitra Wagh Tweet on Supriya Sule

अहो महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या ताई, काविळ झालेल्यांना जग जसं पिवळं दिसतं तसं तुमचं झालंय. सत्तेचा स्ट्राईक रेट कमी झाल्याचा हा परिणाम आहे हे आम्ही समजू शकतो पण लोकलमध्ये महिलेवर बलात्कार झाल्याचं एवढं मोठ्ठं स्टेटमेंट करण्याआधी मोठ्ठ्या ताईंनी थोडी शहानिशा तरी करायला हवी होती… @supriya_sule

तुम्ही मुलीवर लोकल रेल्वेत बलात्कार झाल्याचं ट्विट केलंय पण तसं काहीच घडलं नाही. नाहक मुलीची बदनामी करू नका..

त्या आरोपीनं मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न केला… पोलिसांनी लगेच विनयभंगाचा गुन्हा दाखल त्याला अटक केली… ही वस्तुस्थिती. आपण @grpmumbai
आयुक्त यांच्याकडूनही माहिती घेऊ शकला असता
पण ते न करता बलात्कार झाला म्हणत ट्वीट केलत..
तुमच्या या वक्तव्यामुळे खोट्या बातम्यांचा आणि अफवांचा सुकाळ होण्यास हातभार लागणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की अफवा पसरवू नका आणि माझी संपूर्ण जनतेला विनंती आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका !

अत्याचार करण्याचा प्रयत्न असेल किंवा अत्याचार हे दोन्ही गंभीर आहे. महिला सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाहीच

लोकल मध्ये महिलांना सुरक्षित वातावरण देणं ही रेल्वे पोलिसांची @RPFCR
जबाबदारी आहे, त्यापासून पळ काढता येणार नाही. या निमित्तानं रेल्वे हेल्पलाईन आणि लोकल मधील महिलांबाबतचे गुन्हे याचं ॲाडीट करणं गरजेचं आहे व ते येणाऱ्या दिवसात नक्कीच होईल.

दरम्यान, पीडित तरुणी गिरगाववरून बेलापूरला लोकल ट्रेननं जात होती. या तरुणीचं वय 20 वर्ष आहे. परीक्षेसाठी ही तरुणी लोकलने प्रवास करत होती. डब्यामध्ये कोणी नाही, हे बघून आरोपी डब्यात शिरला आणि त्यानंतर मुलीचा छळ केला. या प्रकरणी तरुणीने लगेच पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत आरोपीला लगेच अटक केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही