Dress Code In Temple | जळगाव जिल्ह्यातील ‘या’ मंदिरात ड्रेस कोड लागू

Dress Code In Temple | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील 34 मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतला आहे. येत्या सात दिवसांमध्ये या मंदिरांमध्ये ड्रेसवर लागू करण्यात येणार आहे.

Dress code enforced in 34 temples in Jalgaon

जळगाव शहरातील ओंकारेश्वर मंदिर, पंचमुखी मारुती मंदिर, शनी मंदिर, शिवधाम मंदिर, इच्छा देवी मंदिर, कालिका माता मंदिर, अष्टभुजा मंदिर, विनायक मंदिर, सूर्यमुखी हनुमान मंदिर, साई मंदिर इत्यादी मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू (Dress Code In Temple) करण्यात येणार आहे.

चोपडा येथील स्वयंभू श्री मुजुमदार गणपती मंदिर, हरेश्वर महादेव मंदिर, नवग्रह मंदिर, बालवीर हनुमान मंदिर या ठिकाणी ड्रेस कोड (Dress Code In Temple) लागू केला जाणार आहे.

दरम्यान, जळगाव जिल्हा परिसरातील पद्मालय देवस्थान (एरंडोल), कष्टभंजन देव मंदिर (सूनसावखेडा), श्रीराम मंदिर (पारोळा), उमामेश्वर मंदिर (उमाळे), गजानन महाराज मंदिर (बांभोरी), भवानी माता मंदिर (रावेर) या ठिकाणी देखील ड्रेस कोड लागू (Dress Code In Temple) करण्यात येणार आहे

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.