Share

Loksabha Elections | लोकसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? शिंदे गटाला मिळणार ‘इतक्या’ जागा

🕒 1 min readLoksabha Elections | मुंबई: सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पक्षांकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीची बैठक पार पडली. तर आता मविआनंतर सत्ताधारी भाजप आणि शिंदे गट देखील तयारीला लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटाची बैठक पार पडली आहे. या … Read more

Published On: 

🕒 1 min read

Loksabha Elections | मुंबई: सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पक्षांकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीची बैठक पार पडली. तर आता मविआनंतर सत्ताधारी भाजप आणि शिंदे गट देखील तयारीला लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकांवर चर्चा करण्यात आली आहे.

2019 मध्ये शिवसेनेने ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, त्या 22 मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहे. शिवसेना शिंदे गटाकडे सध्या 13 खासदार आहे. तर ठाकरे गटाकडे 5 खासदार आहेत. उद्धव ठाकरे गटाकडे असलेल्या खासदारांच्या मतदारसंघात (Loksabha Elections) शिंदे गटाकडून कोण उमेदवार असेल? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

The seat allocation formula for the Lok Sabha elections was decided

आगामी लोकसभा (Loksabha Elections) निवडणुकीमध्ये 2019 प्रमाणे जागा वाटप होणार असल्याची शक्यता आहे. म्हणजेच शिवसेना 22 आणि भाजप 26 हा फॉर्म्युला कायम राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार आता शिंदे गट आणि भाजप रणनीती ठरवणार आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून (Loksabha Elections) गदारोळ पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून सावधान जागा वाटपाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तर ठाकरे गटाकडून 18 जागांचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!