Share

CSK vs GT Qualifier 1 | पहिल्या क्वालिफायरमध्ये ‘या’ पाच खेळाडूंच्या कामगिरीवर असणार सर्वांचं लक्ष

🕒 1 min read CSK vs GT Qualifier 1 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल (IPL) चा सोळावा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. आयपीएलचे प्लेऑफ सामने आजपासून सुरू होणार आहे. आज चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या संघामध्ये पहिला क्वालिफायर सामना होणार आहे. … Read more

Published On: 

🕒 1 min read

CSK vs GT Qualifier 1 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल (IPL) चा सोळावा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. आयपीएलचे प्लेऑफ सामने आजपासून सुरू होणार आहे. आज चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या संघामध्ये पहिला क्वालिफायर सामना होणार आहे. या सामन्यांमध्ये पाच खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष लागणार आहे.

All eyes are on ‘these’ five players in the first qualifier

महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni)

आजच्या सामन्यामध्ये (CSK vs GT Qualifier 1) सर्वांच्या नजरा महेंद्रसिंग धोनीवर असणार आहे. कारण महेंद्रसिंग धोनीची ही शेवटची आयपीएल असू शकते. त्याचबरोबर धोनी चेपॅकमध्ये शेवटचा सामना खेळताना दिसू शकतो, असा अंदाज देखील फॅन्सकडून बांधला  जात आहे.

शिवम दुबे (Shivam Dubey)

चेन्नई सुपर किंग संघातील स्फोटक फलंदाज शिवम दुबे यंदाच्या मोसमात वेगळ्या शैलीत खेळताना दिसला. आयपीएल 2023 मध्ये शिवमने अनेक लांब शॉट मारले आहे. त्याचबरोबर आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा शिवम दुसरा फलंदाज ठरला आहे.

ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad)

ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्ज संघातील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने आयपीएल 2023 मध्ये 500 हून अधिक धावा केल्या  आहेत. त्याचबरोबर त्याने या आयपीएलमध्ये 28 षटकार ठोकले आहेत.

शुभमन गिल (Shubman Gill)

गुजरात टायटन्सला प्लेऑफपर्यंत (CSK vs GT Qualifier 1) नेण्यामध्ये शुभमन गिल मोठा वाटा आहे. या आयपीएल हंगामामध्ये सर्वाधिक धावा करणारा गिल दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याने या हंगामामध्ये आत्तापर्यंत 680 धावा केल्या आहेत.

राशिद खान (Rashid Khan)

राशिद खानने या आयपीएल हंगामामध्ये गुजरात टायटन्ससाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने आत्तापर्यंत 24 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर पर्पल कॅपधारक मोहम्मद शमीच्या नावावरही 24 विकेट आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही