Narayan Rane | शरद पवार राजकारणातही हवेत आण‍ि राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या अध्‍यक्षपदी सुध्‍दा ! – नारायण राणे

Narayan Rane | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून मी निवृत्ती घेणार असल्याचं आज शरद पवारांनी ( Sharad Pawar) घोषणा केली. त्याच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदी कोण असणार? पुढे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय असेल असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसचं राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया देखील येत आहेत. तर काटा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan … Read more

Published On: 

Narayan Rane | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून मी निवृत्ती घेणार असल्याचं आज शरद पवारांनी ( Sharad Pawar) घोषणा केली. त्याच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदी कोण असणार? पुढे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय असेल असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसचं राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया देखील येत आहेत. तर काटा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनीही ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले नारायण राणे (What did Narayan Rane say)

नारायण राणे हे आपल्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. तर गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी ठाकरेंवर देखील टीका केली होती. परंतु आज त्यांनी शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयावर ट्विट करत म्हटलं आहे की, माननीय शरद पवार साहेब, आपण राजकारणातही हवेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुद्धा हवेत! अशा शब्दात त्यांनी पवारांना घेतलेला निर्णयावर विचार करण्यासाठी सांगितलं आहे. तर महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार असावेत अशी भूमिका देखील त्यांनी या ट्विट करत घेतली आहे.

दरम्यान, ‘लोक माझे सांगती’ या शरद पवार यांच्या आत्मचरित्र च्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन मुंबईमध्ये झाले. त्यावेळी शरद पवार यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला. पवार म्हणाले की, मी गेले 24 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे. कोणत्याही माणसाला अति मोह असु नये कुठं थांबायचं याचा विचार केला पाहिजे. तुम्हाला सर्वांना अस्वस्थता वाटू शकते पण मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसचं त्यांनी पुढे मी पक्षाच्या कामासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपलब्ध असेल असं देखील म्हटलं. या संघटनेबाबत पुढे काय करायचं याबाबत एक समिती स्थापन केली जाईल त्यातील सदस्य निर्णय घेतील. तर दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांनी निर्णय घ्यावा असं पवार म्हणाले. तसचं अनेक वर्षे विविध पदावर देखील काम केलं आहे. तर पुढील तीन वर्षे फक्त मी राजकारणात असेल असं देखील पवार यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या-

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही