Share

Railway Job | भारतीय मध्य रेल्वेमध्ये ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Railway Job | टीम महाराष्ट्र देशा: रेल्वेमध्ये नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय मध्य रेल्वे (Indian Central Railway), मुंबई यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र … Read more

Published On: 

Railway Job | टीम महाराष्ट्र देशा: रेल्वेमध्ये नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय मध्य रेल्वे (Indian Central Railway), मुंबई यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

भारतीय मध्य रेल्वे यांच्या आस्थापनेवरील ज्युनिअर टेक्निकल असोसिएट पदाच्या एकूण 99 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

पात्र आणि इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये दिनांक 12 मे 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) नवीन प्रशासकीय इमारत, ६ वा मजला अंजुमन इस्लाम शाळसमोर, डी. एन. रोड, मध्य रेल्वे, मुंबई, पिनकोड- ४००००१ (उपमुख्य कार्मिक अधिकारी (बांधकाम) कार्यालयाच्या नवे पाठवावेत)

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/drive/folders/1RVxzg1M-COI_S7YeXE4tfzGpQmAYA3mX?pli=1

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://cr.indianrailways.gov.in/index.jsp?lang=0

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install