National Health Mission | राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

National Health Mission | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रीय आरोग्य अभियान, गडचिरोली यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली असून सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती … Read more

Published On: 

National Health Mission | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रीय आरोग्य अभियान, गडचिरोली यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली असून सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 107 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये सुपर स्पेशालिस्ट- 02 जागा, स्पेशलिस्ट – 26 जागा, मेडिकल ऑफिसर एमबीबीएस – 29 जागा, मेडिकल ऑफिसर – आयुष पीजी – 01 जागा, मेडिकल ऑफिसर – आयुष यूजी – 02 जागा, मेडिकल ऑफिसर- आरबीएसके – 15 जागा, ऑडिओलॉजिस्ट- 02 जागा, नर्सिंग ट्यूटर – 01 जागा, स्टाफ नर्स – 18 जागा, लॅब टेक्निशियन – 08 जागा, सीटी स्कॅन टेक्निशियन – 01 जागा, डेंटल हायजिनिस्ट – 02 जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (National Health Mission) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (National Health Mission) इच्छुक उमेदवारांना दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी खालील पत्त्यावर उपस्थित राहावे लागणार आहे.

मुलाखतीचा पत्ता (Address of interview)

कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, कॉम्पलेक्स परिसर, गडचिरोली.

जाहिरात पाहा (View Ad)

https://www.zpgadchiroli.in/wp-content/uploads/2023/04/NHM_Gadchiroli_11042023.pdf

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.zpgadchiroli.in/

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही