Share

Eknath Shinde | “अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करा”; मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश

🕒 1 min readEknath Shinde | मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस (Untimely Rains) झाल्याने अनेक पिकांना फटका बसला आहे. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली. तसेच तातडीनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. “नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करा” … Read more

Published On: 

🕒 1 min read

Eknath Shinde | मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस (Untimely Rains) झाल्याने अनेक पिकांना फटका बसला आहे. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली. तसेच तातडीनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

“नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करा”

“राज्यभरात काल ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांना तातडीनं दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे. यादृष्टीनं महसूल यंत्रणेनं लगेच कामाला लागावं आणि पंचनामे करावेत”, असेआदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Eknath Shinde orders District Collectors

ठाणे, पालघरसह राज्यातल्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. वाशीम, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर परिसरातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.

मुंबई, ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्यानं बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!