Share

Sanjay Raut | “फडणवीसांना सनसनाटी निर्माण करण्याची सवय”; संजय राऊतांची बोचरी टीका

🕒 1 min read Sanjay Raut | मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये तुफान कलगितुरा रंगला आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीनंतर फोन करून मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप केला. त्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं. राऊतांनी शनिवारी मुंबईत … Read more

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Raut | मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये तुफान कलगितुरा रंगला आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीनंतर फोन करून मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप केला. त्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं. राऊतांनी शनिवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना फडणवीसांवर आरोप केला आहे.

“फडणवीसांना सनसनाटी निर्माण करण्याची सवय”

“देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करण्याची सवय लागली आहे. ते विरोधी पक्षनेते होते तेव्हाचे फडणवीस आणि आत्ताचे फडणवीस यात खूप फरक दिसतो आहे. त्यांना स्टंट करण्याचा आणि सनसनाटी निर्माण करण्याचा हा छंद का जडला आहे मला माहिती नाही. राजकारणात आपण एकमेकांशी नेहमी बोलत असतो, चर्चा करत असतो”, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

Sanjay Raut Criticize Devendra Fadnavis

“महाराष्ट्रात राजकीय स्थित्यंतर, घडामोडी घडत असताना देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होते तेव्हा अशावेळी विरोधी पक्ष किंवा सरकार बनवू इच्छिता त्यांच्याशी बोलले असतील, बोलले होते. ठीक आहे, पण देवेंद्र फडणवीस इतक्या दिवसांनी सनसनाटी निर्माण करून काय सांगू इच्छित आहेत,” असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

“उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती”

“उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, मात्र आज ते उपमुख्यमंत्री आहेत आणि किती काळ या पदावर राहतील हे सांगता येत नाही. हे सर्व दिल्लीच्या मर्जीप्रमाणे आहे. फडणवीसांनी या सनसनाटीचा आनंद घ्यावा,” असंही संजय राऊतांनी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही