Share

Chandrashekhar Bawankule | “शरद पवारांना फक्त मुस्लिमांची मतं पाहिजेत?”; बावनकुळेंचा संतप्त सवाल

🕒 1 min readChandrashekhar Bawankule | पुणे : पुण्यातील विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर अखेरच्या टप्प्यात प्रचार सुरू असतांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)  यांच्यासहित उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी हल्लाबोल करत असताना मुस्लिमांच्या मतावर भाष्य … Read more

Published On: 

🕒 1 min read

Chandrashekhar Bawankule | पुणे : पुण्यातील विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर अखेरच्या टप्प्यात प्रचार सुरू असतांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)  यांच्यासहित उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी हल्लाबोल करत असताना मुस्लिमांच्या मतावर भाष्य करत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

“उद्धव ठाकरेंच्या पायाखालची वाळू सरकलीय म्हणून”

“उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्यामुळे आणि राहिलेल्या लोकांना थांबवून ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे मध्यावधीची वक्तव्य करतायत” असाही पलटवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

“शरद पवारांना फक्त मुस्लिमांची मतं पाहिजेत?”

“शरद पवारांना फक्त मुस्लिमांची मतं पाहिजेत का? शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचा एक नेता हिंदू विरोधी भाषण करतो, शरद पवार त्याला थांबवत नाही, हे चुकीचे आहे, पवारांनी भाषण थांबवलं पाहिजे होते”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हणाले आहेत.

“कसब्याची निवडणूक लढत असतांना आम्ही विकासावर निवडणूक लढत आहे. पण आमच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते. जी टीका आम्ही बोलू शकत नाही त्या भाषेत आमच्यावर टीका केली जाते. महायुतीचे उमेदवार असलेले हेमंत रासने हे शंभर टक्के निवडून येईल” असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

 

“कसबा हा गिरीश बापटांचा आहे, मुक्ता टिळक यांनी कसब्यात मोठी कामं केली आहेत, त्यानंतर आता हेमंत रासने या मतदारसंघात विकासकामं करणार, कसब्यात आमचा 100 टक्के विजय आहे”, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!