Job Vacancies | ‘या’ योजनेअंतर्गत इच्छुक उमेदवारांना नोकरीची संधी, आजच करा अर्ज

Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा: सरकार विविध भरती प्रक्रियेच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते. अशात माजी सैनिक कर्मचारी योगदान योजनेअंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहेत. त्याचबरोबर या पदांसाठी मुलाखती आयोजित करण्यात येणार आहे. माजी सैनिक … Read more

Published On: 

Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा: सरकार विविध भरती प्रक्रियेच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते. अशात माजी सैनिक कर्मचारी योगदान योजनेअंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहेत. त्याचबरोबर या पदांसाठी मुलाखती आयोजित करण्यात येणार आहे.

माजी सैनिक कर्मचारी योगदान योजनेअंतर्गत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Vacancies) विविध पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, दंत चिकित्सा/ दंत सहाय्यक, लॅब तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, क्लर्क आणि महिला परिचर पदांच्या रिक्त जागा आहेत.

या भरती प्रक्रियेतील (Job Vacancies) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी (Job Vacancies) इच्छुक उमेदवारांना दिनांक 2 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे. त्याचबरोबर इच्छुक उमेदवारांना 10 मार्च 2023 रोजी स्व-खर्चाने पुढील पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहणे आवश्यक आहे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता (Address to submit application)

ईसीएचएस सेल, एसटीएन मुख्यालय, देवलाली, जि. नाशिक.

मुलाखतीसाठी पत्ता (Address for interview)

स्टेशन मुख्यालय, देवलाली, जि. नाशिक.

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://echs.gov.in/

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1YAPSx8zxue8oMn1GeK0g96rBCt7WHAPH/view

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही