Jitendra Awhad | मोठी बातमी! जितेंद्र आव्हाड यांना कोणत्याही क्षणी अटक होणार? नेमकं प्रकरण काय?

Jitendra Awhad | मुंबई : २०२४ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना  वेग आला आहे. अशातच एक मोठी बातमी समोर येतेय. ‘मला कोणत्याही क्षणी अटक होईल’, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ते म्हणाले, “मी धक्कादायक माहिती महाराष्ट्राला देऊ इच्छितो. केंद्रातील काही अधिकाऱ्यांनी मला सूचक … Read more

Published On: 

Jitendra Awhad | मुंबई : २०२४ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना  वेग आला आहे. अशातच एक मोठी बातमी समोर येतेय. ‘मला कोणत्याही क्षणी अटक होईल’, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

ते म्हणाले, “मी धक्कादायक माहिती महाराष्ट्राला देऊ इच्छितो. केंद्रातील काही अधिकाऱ्यांनी मला सूचक माहिती दिलीय. ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्या कानावर घातलंय की, कुठल्याही परिस्थितीत तुला अटक केली जाईल.”

त्याचबरोबर “निदान ठाणे महापालिका निवडणूक होईपर्यंत आणि त्यानंतरचे काही महिने तुला आतमध्ये ठेवण्याचा कार्यक्रम ठरलेला आहे. तसं माझ्या विरोधात एकही केस नाही. पण ही जेव्हा बातमी येते तेव्हा आश्चर्य वाटतं”, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटल आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर नेमकं कोणत्या गुन्ह्याअंतर्गत अटक होईल, याबाबतची माहिती मात्र त्यांनी दिलेली नाही.

जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या दाव्यानंतर त्यांना अटक करण्यासाठी नेमके कोणाचे प्रयत्न सुरु आहेत? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. या सर्व घडामोडींच्या दरम्यान जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जितेंद्र आव्हाड याबाबत काही चर्चा करतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

Journalist at Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही