Vitamin C Deficiency | विटामिन सीच्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर दिसू शकतात ‘ही’ लक्षणं

Vitamin C Deficiency | टीम महाराष्ट्र देशा: विटामिन सीच्या मदतीने आपली त्वचा (Skin) मऊ आणि चमकदार राहते. जेव्हा आपल्या शरीरात विटामिन सीची कमतरता निर्माण होते, तेव्हा त्वचेवर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण व्हायला लागतात. विटामिन सी एक अँटिऑक्सिडंट आहे, जे त्वचेला बाह्य आणि अंतर्गत दोन्ही प्रकारे निरोगी ठेवण्यास मदत करते. जेव्हा शरीरात विटामिन सीची कमतरता असते तेव्हा चेहऱ्यावर अनेक प्रकारचे लक्षणे दिसायला लागतात. शरीरात विटामिन सीची कमतरता असल्यास चेहऱ्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात.

डार्क स्पॉट

विटामिन सीच्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर डार्क स्पॉट यायला लागतात. चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे डाग दिसायला लागतात. त्याचबरोबर विटामिन सी पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे हिरड्यांवर देखील सूज यायला लागते. विटामिन सीच्या कमतरतेमुळे तोंडाच्या आरोग्यावर परिणाम होतो.

त्वचा कोरडी होते

शरीरामध्ये जेव्हा विटामिन सीची कमतरता निर्माण होते, तेव्हा त्वचा अधिक कोरडी दिसायला लागते. विटामिन सीच्या कमतरतेमुळे नखे खडबडीत व्हायला लागतात. त्याचबरोबर विटामिन सीच्या कमतरतेमुळे नखांवर लाल आणि पांढरी पुरळ निर्माण व्हायला लागते.

चेहऱ्यावर सुरकुत्या यायला लागतात

विटामिन सीची कमतरता निर्माण झाल्यावर चेहऱ्यावर सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणे दिसायला लागतात. विटामिन सीच्या कमतरतेमुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे देखील यायला लागतात. ही लक्षणे दिसायला लागल्यावर समजून घ्यायचे की शरीरातील विटामिन सी कमी झाले आहे.

टीप: वरील माहितीसाठी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.