Jitendra Awhad | “हा अर्थसंकल्प म्हणजे फुगवलेला फुगा”; जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल

Jitendra Awhad | मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेृत्वाखालील एनडीए सरकारचा 2023/2024 या आर्थिक वर्षांसाठी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात अनेक गोष्टी महाग तर अनेक गोष्टी स्वस्त केल्या.

दरम्यान, या अर्थसंकल्पावर देशभरातून प्रतिक्रिया आली. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनीही या अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया दिल्या आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार जिंतेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, “अर्थसंकल्प म्हणजे देशाची दिशा दाखवणारं आणि भविष्यात काय करणार आहोत, हे सांगणारं वास्तव म्हणजे अर्थसंकल्प. एकीकडे आर्थिक मंदी आली असताना भारत त्याला कसं सामोरं जाईल, ही आशा देखील धुळीस मिळाली आहे.” सर्वसामान्यांना यातून काही मिळाले असे वाटत नाही. अर्थसंकल्पातून केवळ आकड्यांचे बुडबुडे दाखवण्यात  आले आहेत. त्यामुळे हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ फुगवलेला फुगा असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

नाना पटोले काय म्हणाले?

अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, “देशातील सर्वात जास्त लोकांना रोजगार देणा-या कृषी क्षेत्राला आणि शेतक-यांना अर्थसंकल्पातून काही दिलासा मिळाला नाही.” ‘आकर्षक घोषणा, अलंकारिक शब्द, आकड्यांचा खेळ आणि गुलाबी स्वप्ने यापलिकडे अर्थसंकल्पात काही नाही’, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

पुढे ते म्हणाले, “महागाई, बेरोजगारी, शेतकरी, मनरेगा, पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅसच्या किंमती शेतमालाला किमान आधारभूत किंमत या ज्वलंत प्रश्नावर चकार शब्द अर्थमंत्र्यांनी काढला नाही. देशातील जनतेची घोर निराशा करण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे.”

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.