Share

Jitendra Awhad | “शरद पवार आजही भाजपाबरोबर”; प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर जितेंद्र आव्हाड म्हणाले…

Jitendra Awhad | मुंबई :  शिवसेनेचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने युतीची घोषणा केली. त्यावरुन अनेकांनी या युतीवर टीका केली. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीमध्ये जाणार का याबाबत शंका होती. अशातच काल प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार … Read more

Published On: 

Jitendra Awhad | मुंबई :  शिवसेनेचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने युतीची घोषणा केली. त्यावरुन अनेकांनी या युतीवर टीका केली. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीमध्ये जाणार का याबाबत शंका होती.

अशातच काल प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आजही भाजपाबरोबर आहेत, असं विधान केलं. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रकाश आंबेडकरांना इशारा दिला आहे.

“महाविकास आघाडीमधील घटक पक्षातील नेतृत्वाने किंवा त्यांच्या मित्रपक्षातील नेतृत्वाने शरद पवार साहेबांबद्दल बोलताना आदराने बोलावं. मतभेद सगळ्यांचेच असतात, पण त्याच्यातून विष ओकलं जाऊ नये. हे पटण्यासारखं नाही. तेव्हा सगळ्यांनीच काळजी घ्यावी, अशी प्रतिक्रियाही जितेंद्र आव्हाड यांनी दिली. तसेच सत्तेसाठी वाट्टेल ते सहन करणार नाही”, अशा आशयाचं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?

“शरद पवार हे आजही भाजपबरोबर आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा शपथविधी झाला होता. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांनी मुलाखत छापून आली होती. त्यात अजित पवारांनी सांगितलं की, लोक मला का दोष देत आहेत, समजत नाही. हे आमच्या पक्षांचं ठरलं होतं. मी फक्त पहिला गेलो. 2019च्या लोकसभेपूर्वीच हे ठरलं होतं,” असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install