Share

Ajit Pawar | खाते वाटपाची यादी राज्यपालांकडे, अजित पवार गटाला मिळणार ‘ही’ खाती

Ajit Pawar | मुंबई: अजित पवार काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री तर त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या मंत्र्यांचा शपथविधी झाल्यापासून खातेवाटपाची वाट बघितली जात होती. आज या नवीन मंत्र्यांचं खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Important portfolio will go to Ajit Pawar group अजित पवार (Ajit Pawar) गटाकडे … Read more

Published On: 

Ajit Pawar | मुंबई: अजित पवार काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री तर त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या मंत्र्यांचा शपथविधी झाल्यापासून खातेवाटपाची वाट बघितली जात होती. आज या नवीन मंत्र्यांचं खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Important portfolio will go to Ajit Pawar group

अजित पवार (Ajit Pawar) गटाकडे महत्त्वाची खाती जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. खाते वाटपाची यादी राज्यपालांकडे पोहोचलेली असून थोड्याच वेळात ते त्यावर सही करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. राज्यपाल लवकरच ही यादी जाहीर करतील, असही अजित पवारांनी सांगितलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार अजित पवार गटाला (Ajit Pawar) खालील खाते मिळू शकतात.

अर्थ आणि नियोजन – अजित पवार (Ajit Pawar)

महिला व बालविकास – अदिती तटकरे (Aditi Tatkare)

सहकार – दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil)

वैद्यकीय शिक्षण – हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)

अन्न व नागरी – छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावरून शिंदे गटातील आमदार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवार (Ajit Pawar), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या दररोज बैठका होत आहेत. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटला नसल्याचं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install