प्रतिनिधी, 11 ऑक्टोबर: गेल्या चार वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावरील सुनावणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ही सुनावणी येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून, त्यानंतर काही दिवसांतच या ऐतिहासिक खटल्याचा निकाल अपेक्षित आहे. या निकालावर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यासह पक्षाचे पुढील राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे.
३० ऑक्टोबरच्या तारखेबाबत सर्वोच्च न्यायालयाने एका वेगळ्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान तोंडी टिप्पणी केली. न्यायालयात पश्चिम बंगाल एसआयआर (SIR) प्रकरणाची सुनावणी तातडीने घेण्याची विनंती वकिलांकडून करण्यात आली होती. त्यावर बोलताना न्यायालयाने स्पष्ट केले की, प्रथम शिवसेनेची सुनावणी ३० ऑक्टोबरपर्यंत संपवायची आहे आणि त्यानंतरच बंगाल प्रकरणाचे कामकाज हाती घेतले जाईल.
सध्या न्यायालयात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर एकनाथ शिंदे गटाचा युक्तिवाद सुरू आहे. शिंदे गटाची बाजू मांडणारे प्रसिद्ध वकील नीरज कौल यांनी काल पक्षचिन्हाबाबतचा आपला युक्तिवाद पूर्ण केला. आता येत्या १३ ऑक्टोबर रोजी ते अपात्रतेच्या मुद्द्यावर युक्तिवाद करणार आहेत.
दरम्यान, या सुनावणीत न्यायमूर्ती बागची यांनी नीरज कौल यांना वारंवार एकच प्रश्न विचारला. निवडणूक आयोगाकडे शिंदे गटाला चिन्ह देण्याऐवजी दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कौल यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या बाजूनेही युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. हे सर्व कामकाज ३० ऑक्टोबरपूर्वी पूर्ण होऊन अंतिम फैसला येण्याची शक्यता असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष याकडे लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- बीडमध्ये पुन्हा रक्तरंजित राडा; दोन गटात तुफान हाणामारी, लोखंडी रॉडने फोडली डोकी
- दीपके दिल्लीत, राहुल गांधी चेन्नईत; काँग्रेसने CJP च्या आंदोलनाकडे पाठ फिरवण्यामागे आहेत ही ३ कारणे
- …म्हणून तत्कालीन संरक्षण मंत्र्यांनी नाना पाटेकरांना थेट कारगिल युद्धात पाठवले; थरारक किस्सा
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









