“मी गर्लफ्रेंडला गुपचूप हॉटेलमध्ये आणायचो”; शिखर धवनचा मोठा खुलासा

Shikhar Dhawan reveals sneaking girlfriend into hotel; Rohit Sharma complained.

Published On: 

Shikhar Dhawan reveals sneaking girlfriend into hotel; Rohit Sharma complained.

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा ‘गब्बर’ म्हणून ओळखला जाणारा स्टार सलामीवीर शिखर धवन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी, तो सध्या सोशल मीडियावर आणि आपल्या आत्मचरित्रामुळे चर्चेत आहे. ‘द वन: क्रिकेट, माय लाईफ अँड मोर’ या आत्मचरित्रात धवनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील अनेक प्रसंगांसह काही खासगी किस्सेही शेअर केले आहेत, ज्यात त्याच्या रिलेशनशिप आणि त्यावेळी सहकारी खेळाडू रोहित शर्माच्या प्रतिक्रियेबद्दलचे धक्कादायक खुलासे आहेत.

२००६ मध्ये भारत अ संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान धवनने त्याच्या रिलेशनशिपबद्दल काही गुपितं उघड केली आहेत. भारतीय संघातून बाहेर पडल्यानंतर लिहिलेल्या या पुस्तकात धवनने त्याच्या प्रेयसीला टीम हॉटेलच्या खोलीत तो कसा गुपचूप आणायचा, याचा एक जुना किस्सा सांगितला आहे.

Shikhar Dhawan’s Girlfriend Confession

शिखर धवन जेव्हा टीम इंडियामधून खेळत असे, तेव्हा तो रोहित शर्माबरोबर त्याची रूम शेअर करायचा. याच काळात तो खुलासा करतो की, रोहितला त्याची प्रेयसी त्यांच्या खोलीत येणं अजिबात आवडत नव्हतं. त्यांच्या नात्याची बातमी संपूर्ण संघात कशी पसरली, याचाही उल्लेख त्याने केला आहे.

धवनने ( Shikhar Dhawan ) आपल्या पुस्तकात लिहिले आहे, “ती खूप सुंदर होती आणि मी अचानक पुन्हा प्रेमात पडलो. मी असा विचार केला की ती माझ्यासाठीच बनलेली आहे आणि मी तिच्याशी लग्न करण्यासाठी तयार झालो होतो.” २००६ च्या भारत अ संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर धवनने सुरुवातीला उत्कृष्ट कामगिरी केली होती. परंतु, त्याने कबूल केले की तो त्याच्या मैत्रिणीबरोबर, जिला तो ‘एलन’ म्हणत असे, जास्त वेळ घालवू लागल्याने तिच्या प्रेमात पडला.

धवन ( Shikhar Dhawan ) किस्सा सांगताना लिहितो, “मी सराव सामन्यात अर्धशतकाने सुरुवात केली आणि दौरा चांगला चालला होता. प्रत्येक सामन्यानंतर, मी एलनला भेटायचो आणि मग तिला मी आमच्या हॉटेल रूममध्ये घेऊन जाऊ लागलो, जिथे मी रोहित शर्माबरोबर रूम शेअर करायचो. कधीकधी रोहित हिंदीत तक्रार करायचा, ‘तू मला झोपू देशील का?’ रोहित शर्माला त्याची गर्लफ्रेंड रूममध्ये येणं आवडत नसे आणि त्यामुळे तो वैतागून हे बोलायचा.”

धवनच्या नात्याची बातमी संपूर्ण संघाला तेव्हा कळली, जेव्हा भारताच्या एका टीम सिलेक्टरने त्याला त्याच्या मैत्रिणीसोबत पाहिले. धवन पुढे म्हणाला की, “एके संध्याकाळी मी एलनबरोबर जेवत होतो आणि ती माझ्या खोलीत असल्याची बातमी संपूर्ण संघात वाऱ्यासारखी पसरली. आमच्यासोबत दौऱ्यावर असलेल्या एका वरिष्ठ राष्ट्रीय निवडकर्त्याने आम्हाला लॉबीमध्ये हातात हात घालून चालताना पाहिले. मला त्यावेळी तिचा हात सोडावा असं वाटलं नाही, कारण मी कोणताही गुन्हा करत नव्हतो.” असे धवनने आपल्या पुस्तकात स्पष्ट केले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही