Sharad Pawar | शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणार, पवारांनी केला मोठा खुलासा

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी (2 मे) पार पडले. या पुस्तकातून शरद पवार यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहे. ते आता कोणतीही निवडणूक लढणार नाही, त्याचबरोबर राष्ट्रवादी अध्यक्ष पदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा पवारांनी केली आहे. त्यांच्या या खुलासानंतर राजकीय वर्तुळात खळबळ … Read more

Published On: 

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी (2 मे) पार पडले. या पुस्तकातून शरद पवार यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहे. ते आता कोणतीही निवडणूक लढणार नाही, त्याचबरोबर राष्ट्रवादी अध्यक्ष पदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा पवारांनी केली आहे. त्यांच्या या खुलासानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी नवीन समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही नवीन समिती अध्यक्ष पदाबाबत पुढे निर्णय घेईल, असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले आहे. पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण असणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

आज बोलत असताना शरद पवार (Sharad Pawar) राजकीय आठवणींमध्ये गुंग झाले होते. ते म्हणाले, “आमचं घराणं काँग्रेसच्या नव्हे तर शेतकरी कामगार पक्षांच्या विचारांचं होतं. माझे वडील बंधू शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. महाराष्ट्र निर्मितीच्या चळवळीमध्ये आम्ही काँग्रेसच्या जवळ आलो. त्याचबरोबर मी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांकडे आकर्षित झालो होतो. त्यानंतर मी काँग्रेस पक्षाचा सदस्य झालो.”

पुढे बोलताना ते म्हणाले, ” 1967 साली मला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मी विविध पदांवर काम केलीत. तेव्हापासून राजकारणात मी आहे. यानंतर आता फक्त तीन वर्ष मी राजकारणात राहणार आहे.” पवारांच्या (Sharad Pawar) या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही