Share

SBI च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! आता पैसे पाठवणं महागात पडणार; १५ फेब्रुवारीपासून नवे नियम लागू!

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! १५ फेब्रुवारीपासून २५ हजारांच्या वरील ऑनलाइन IMPS व्यवहारांवर आता शुल्क मोजावे लागणार आहे. पाहा नवे दर.

Published On: 

SBI IMPS Charges: स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, नियम बदलले

SBI– तुमचाही पगार स्टेट बँकेत जमा होतो का? किंवा तुमचं मुख्य अकाऊंट SBI मध्ये आहे? जर हो, तर ही बातमी तुमचं टेन्शन थोडं वाढवणारी आहे. कारण, देशातील सर्वात मोठ्या बँकेने म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. आतापर्यंत आपण बिनधास्तपणे मोबाईलवरून पैसे ट्रान्सफर करत होतो, पण आता बँकेने या फ्री सर्व्हिसला कात्री लावली आहे. बँकेने ऑनलाइन IMPS व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

SBI IMPS Charges

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, २५ हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार अजूनही मोफतच असतील, त्यामुळे छोट्या व्यवहारांना मोठा फटका बसणार नाही. पण, जर तुम्ही SBI IMPS Charges च्या नव्या स्लॅबमध्ये आलात, म्हणजेच २५ हजारांच्या वर रक्कम पाठवली, तर तुम्हाला चार्ज द्यावा लागेल. हे नवीन दर १५ फेब्रुवारी २०२६ पासून लागू होणार आहेत.

जर तुम्ही नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग वापरत असाल, तर खालीलप्रमाणे पैसे कट होतील:

२५,००० ते १ लाख रुपये: २ रुपये + जीएसटी

१ लाख ते २ लाख रुपये: ६ रुपये + जीएसटी

२ लाख ते ५ लाख रुपये: १० रुपये + जीएसटी

म्हणजेच, रक्कम जितकी मोठी, तितका चार्ज जास्त. विशेष म्हणजे, शाखेमध्ये जाऊन IMPS केल्यास हे शुल्क २ ते २० रुपयांपर्यंत असतील, त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

असं असलं तरी, बँकेने काही खास खात्यांना यातून सूट दिली आहे. यामध्ये बीएसबीडी (BSBD) खाती, संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांची खाती (DSP, PMSP, CGSP) आणि ‘एसबीआय रिश्ते’ सारख्या खात्यांवर हे चार्जेस लागणार नाहीत.

दुसरीकडे, १ डिसेंबर २०२५ पासूनच बँकेने एटीएम चार्जेसमध्येही वाढ केली आहे. दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून मोफत मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढल्यास आता २३ रुपये + जीएसटी मोजावा लागतोय. त्यामुळे आता ऑनलाइन असो वा ऑफलाइन, एसबीआय ग्राहकांना व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवावं लागणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही