धाराशिव, 23 ऑक्टोबर: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी धाराशिव येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. यानंतर विजयाचा मोठा दावा करत, ‘अंदर से कौन था’ हे २७ तारखेला निकाल लागल्यावर स्पष्ट होईल, असे सूचक विधान त्यांनी केले आहे.
डॉ. पाटील यांनी विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. चव्हाण यांना गेल्या १८ वर्षांच्या कार्यकाळात पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यात अपयश आले असून, आता मतदारांना बदल हवा असल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे, या निवडणुकीत आपल्याला महाविकास आघाडीसोबतच महायुतीतील काही नेत्यांचेही छुपे सहकार्य मिळत असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. सुरुवातीपासूनच महायुतीत काहीशी नाराजी असल्याची चर्चा असताना, मतदानाच्या दिवशी आलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे.
राजकीय दाव्यांसोबतच डॉ. पाटील यांनी मतदान प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींवरही बोट ठेवले आहे. यंदा निवडणुकीच्या रिंगणात तब्बल ४१ उमेदवार असल्याने मतपत्रिकेचा आकार खूपच मोठा झाला आहे. त्यामुळे मतदानानंतर या मोठ्या मतपत्रिकेची घडी घालून ती मतपेटीत टाकताना मतदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आक्षेप त्यांनी नोंदवला.
स्वतः मतदान करण्यासाठी दोन मिनिटांऐवजी पंधरा मिनिटे लागल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. मतदानापूर्वी प्रशासनाने याचे प्रात्यक्षिक का घेतले नाही, असा सवाल करत या प्रकाराबाबत आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मतपत्रिकेच्या या किचकट प्रक्रियेमुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘मला त्याच्यासोबत फलंदाजी करायला आवडते’: सामनावीर ठरल्यानंतर संजू सॅमसनने उलगडले अभिषेक शर्मासोबतचे समीकरण
- भारताचे टी-२० मधील सर्वोच्च ५ यशस्वी रन-चेस: न्यूझीलंडविरुद्ध रचला विक्रम
- न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर संजू सॅमसनचे सोशल मीडियावरील टीकेबाबत मोठे विधान
Quick Answers
डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या दाव्यानुसार, त्यांना या निवडणुकीत महाविकास आघाडीसोबतच महायुतीतील काही नेत्यांचेही छुपे सहकार्य मिळत आहे.
सतीश चव्हाण यांना गेल्या १८ वर्षांच्या कार्यकाळात पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यात अपयश आले असून आता मतदारांना बदल हवा आहे, अशी टीका डॉ. पाटील यांनी केली.
निवडणुकीच्या रिंगणात ४१ उमेदवार असल्याने मतपत्रिकेचा आकार खूप मोठा झाला आहे. त्यामुळे मतदानानंतर मतपत्रिकेची घडी घालून ती मतपेटीत टाकताना मतदारांना अडचणी येत असल्याचा आक्षेप त्यांनी नोंदवला.
स्वतः मतदान करण्यासाठी दोन मिनिटांऐवजी पंधरा मिनिटे लागल्याचे सांगत, या प्रकाराबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








