Share

श्वास घेण्यास त्रास अन् मध्यरात्री मित्राला मेसेज; नाना पाटेकरांच्या शेवटच्या तासांत नेमकं काय घडलं? डॉक्टरांनी सांगितला घटनाक्रम

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनापूर्वीच्या शेवटच्या काही तासांत नेमकं काय घडलं, याचा सविस्तर घटनाक्रम डॉ. शेखर साळकर यांनी स्पष्ट केला आहे.

Published On: 

Nana Patekar NAAM Foundation

गोवा, 9 ऑक्टोबर: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यातील डोना पावला येथील राहत्या घरी वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनापूर्वीच्या शेवटच्या काही तासांत नेमकं काय घडलं, याचा घटनाक्रम मणिपाल रुग्णालयाच्या ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी सांगितला आहे. मध्यरात्री अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मित्राला मेसेज केला होता, मात्र उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

डॉ. साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सुमारे अडीच वाजता पाटेकर यांनी त्यांच्या एका मित्राला मेसेज करून अस्वस्थ वाटत असल्याचे आणि छातीच्या डाव्या बाजूला वेदना होत असल्याचे कळवले होते. मात्र, रात्री हा मेसेज न पाहता आल्याने तो मित्र पहाटे चार वाजता त्यांच्या घरी पोहोचला. घरी पोहोचल्यावर मित्राला पाटेकर यांना श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत असल्याचे आणि खूप घाम येत असल्याचे निदर्शनास आले. घटनेच्या वेळी कुटुंबातील सदस्य उपस्थित नव्हते, तर केवळ मित्र आणि देखभाल करणारी व्यक्ती त्यांच्यासोबत होती.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मणिपाल रुग्णालयाचे वैद्यकीय पथक रुग्णवाहिकेसह त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि डॉक्टरांनी घटनास्थळीच सीपीआर देण्यास सुरुवात केली. डॉ. साळकर यांनी स्पष्ट केले की, पहाटे ४.२० च्या सुमारास नाना पाटेकर यांना रुग्णालयात आणण्यात आले, परंतु दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे ते एक तास ‘कार्डियाक मसाज’ देऊन त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्यात यश आले नाही. अखेर पहाटे ५.२० वाजता त्यांना अधिकृतपणे मृत घोषित करण्यात आले.

या घटनेची वैद्यकीय-कायदेशीर (मेडिको-लिगल) नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला होता. निधनापूर्वी केवळ चार दिवसांपूर्वी (४ ऑक्टोबर) ते गोव्यातील एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी ‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’, ‘अब तक छप्पन’ आणि ‘नटसम्राट’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यातील डोना पावला येथील राहत्या घरी वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही