प्रतिनिधी, 18 नोव्हेंबर: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जय शहा यांची अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड झाल्याची घोषणा केली आहे. ते २०३० पर्यंत या पदावर कायम राहणार असल्याचे आयसीसीने सोमवारी स्पष्ट केले. बीसीसीआयचे माजी सचिव असलेल्या शहा यांच्या या बिनविरोध निवडीनंतर भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने त्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. रोहितसोबतच इतर आजी-माजी क्रिकेटपटूंनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.
जय शहा आणि रोहित शर्मा यांच्यात नेहमीच जवळचे संबंध आणि कामाच्या बाबतीत चांगला ताळमेळ राहिला आहे. दोघांमध्ये एकमेकांबद्दल परस्पर आदर असून अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांच्यातील हलकेफुलके क्षण पाहायला मिळाले आहेत. शहा यांच्या दुसऱ्या पर्वासाठी रोहितने ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरून एक खास संदेश शेअर केला आहे.
रोहितने १६ नोव्हेंबर २०२६ रोजी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “आयसीसी अध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्याबद्दल @JayShah भाई यांचे खूप खूप अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!”
वेस्ट इंडिजमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतीय संघाने २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकला होता. या विजयानंतरच जय शहा यांनी आयसीसी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती.
📌 महत्वाच्या बातम्या
- अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दरबारात प्रसादात भेसळ? ४ दुकानांना टाळे, ८५० किलो मिठाई जप्त
- ‘मुली मुलांवर नाही, तर पैशांवर प्रेम करतात’, इंदुरीकर महाराजांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
- अजित पवारांच्या विमान दुर्घटनेला रोहित पवारांच्या कारखान्याचा धूर जबाबदार? भाजपचा गंभीर आरोप








