Share

IPL 2023 | विराट कोहलीला मागे टाकत धोनीने रचला ‘हा’ विक्रम

🕒 1 min read IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएलमध्ये जुने विक्रम मोडले जातात आणि नवे विक्रम रचले जातात. अशा चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) चा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) च्या नावावर आणखी एक नवीन विक्रम नोंदवण्यात आला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये धोनीने  … Read more

Published On: 

🕒 1 min read

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएलमध्ये जुने विक्रम मोडले जातात आणि नवे विक्रम रचले जातात. अशा चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) चा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) च्या नावावर आणखी एक नवीन विक्रम नोंदवण्यात आला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये धोनीने  राजस्थानचा फलंदाज ध्रुव जुरेलला बाद केलं होतं. धोनीने डायरेक्ट हिट करत जुरेलला बाद केलं. त्यानंतर धोनीच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली.

धोनीने रचला ‘हा’ विक्रम (Dhoni created this record)

आयपीएल (IPL 2023) मध्ये धोनीने सर्वाधिक गडी धावबाद करण्याचा विक्रम केला आहे. धोनीने आतापर्यंत 23 खेळाडूंना रन आउट केलं आहे. तर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) तर  तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीचे नाव आहे. विराट कोहली (Virat Kohli) ने आयपीएलमध्ये आतापर्यंत 19 खेळाडू धावबाद केले आहे.

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल (IPL 2023) च्या इतिहासात धोनीने आतापर्यंत सर्वात जास्त खेळाडूंना रन आउट केलं आहे. यष्टीरक्षणाच्या बाबतीमध्ये कोणताही खेळाडू धोनीचा हात पकडू शकत नाही. वयाच्या 41 व्या वर्षी धोनीची खेळी आणि चालाखी तरुणाईला लाजवेल अशी आहे. यष्टीरक्षण कौशल्याच्या जोरावर धोनीने आजपर्यंत अनेक सामने जिंकले आहेत.

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यामध्ये धोनीने डायरेक्ट हिट मारत जुरेलला आऊट केल्यानंतर प्रेक्षकांनी धोनीच्या नावाची घोषणाबाजी सुरू केली होती. या सामन्यामध्ये नेहमीप्रमाणेच धोनीची शानदार विकेटकीपिंग पाहायला मिळाली. नेहमीप्रमाणे काल जयपूरचे सवाई मानसिंग स्टेडियम धोनीच्या फॅन्सने खचाखच भरलेले दिसले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही