बाजारसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रास राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार

जिल्ह्यातील १२ प्राथमिक आरोग्य केंद्र व २६ आरोग्य वर्धिनी केंद्रांचाही समावेश छत्रपती संभाजीनगर :- वैद्यकीय संस्थामध्ये स्वच्छता व संसर्ग नियंत्रण तसेच वैद्यकीय सेवांची गुणवत्ता वाढवण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने कायाकल्प पुरस्कार देण्यात येतो. सन २०२३-२४ या वर्षासाठी  जिल्ह्यातील बाजार सावंगी या प्राथमिक आरोग्य केंद्रास राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून जिल्हयातील १२ … Read more

Published On: 

बाजारसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रास राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार

जिल्ह्यातील १२ प्राथमिक आरोग्य केंद्र व २६ आरोग्य वर्धिनी केंद्रांचाही समावेश

छत्रपती संभाजीनगर :- वैद्यकीय संस्थामध्ये स्वच्छता व संसर्ग नियंत्रण तसेच वैद्यकीय सेवांची गुणवत्ता वाढवण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने कायाकल्प पुरस्कार देण्यात येतो. सन २०२३-२४ या वर्षासाठी  जिल्ह्यातील बाजार सावंगी या प्राथमिक आरोग्य केंद्रास राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून जिल्हयातील १२ प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच २६ आरोग्यवर्धिनी केंद्रांनाही कायाकल्प जाहीर झाला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी दिली आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने सन २०२३-२४ या वर्षातील कायाकल्प पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील बाजारसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रथम क्रमांकाचा कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराची रक्कम दोन लाख रुपये आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र गणोरी, आळंद, जातेगांव, बाबरा, वेरुळ, गदाना, दौलताबाद, पिंपळवाडी, कचनेर, सि.वाडगांव. चापानेर, करंजखेडा या १२ प्राथमिक आरोग्य केद्रांना उत्तेजनार्थ प्रत्येकी ५० हजार रुपयांचे पारीतोषिक मिळाले आहे.

तसेच किनगांव आरोग्य वर्धिनी केंद्रास १ लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. परिबावडा आरोग्य वर्धिनी केंद्रास ५० हजार रुपये प्रथम उत्तेजनार्थ तसेच पार्थी आरोग्य वर्धिनी केंद्रास ३५ हजार रुपयांचा व्दितीय उत्तेजनार्थ पुरस्कार  जाहीर झाला आहे. तसेच तिसगांव, सुलतानपुर, जेहुर, टाकळीराजा, बहीरगांव, पाडाळी, कृष्णापुर, बोकुडजळगाव, मंगरुळ, पंढरपुर, चौका, डिग्गी, जिकठाण, पिसादेवी, आडगांव बु., सोलनापुर, चिंचडगाव, जटवाडा, सावंगी, माळीवडगांव, येसगांव, गेवराई बु.,घटांब्री, वाकला या आरोग्य वर्धिनी केंद्रांना उत्तेजनार्थ प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे.

ग्रामीण नागरीकांना चांगल्या आरोग्याच्या सोयी सुविधा देऊन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. विनायक मुंढे, जिल्हा गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉ. वासेफ सिददीकी यांनी कौतूक केले आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही