Supreme Court । दिल्ली दारू घोटाळ्यात मनी लाँड्रींग प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांना अटक करण्यात आली होती. त्यांना दिल्लीतील ट्रायल कोर्टानं जामीनही मंजूर केला होता, मात्र दिल्ली उच्च न्यायालयानं त्यांच्या जामिनावर अंतरिम स्थगिती दिली. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयानंही (Supreme Court) अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का दिला.
जामीन स्थगितीविरोधात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत कोणताच निर्णय झाला नसल्याने केजरीवाल यांना तुरुंगातच राहावं लागणार आहे. आज न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि एस.वी. भट्टी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.
यावेळी सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांच्या जामिनावरील स्थगिती हटवण्यास नकार दिला. जोपर्यंत दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत अरविंद केजरीवाल यांना जामीन देता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. म्हणजेच केजरीवाल यांच्या याचिकेवर २६ जून रोजी सुनावणी होणार आहे.
दरम्यान, दिल्लीतील मद्य विक्री घोटाळ्याप्रकरणी ईडीने २१ मार्च रोजी केजरीवाल यांना अटक केली होती. त्यानंतर १० मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन दिला.
महत्वाच्या बातम्या
- विधानसभेसाठी शरद पवार ॲक्शन मोडमध्ये; ‘चिन्हासाठी’ निवडणूक आयोगात धाव
- मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री दिल्ली दौऱ्यावर
- मनोज जरांगे ४ जून पासून उपोषणाला बसणार; देवेंद्र फडणवीसांमुळे ‘ही’ वेळ आली
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







