रोहित शर्मा पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार होणार? MI च्या एका पोस्टने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

हार्दिक पांड्या पंजाब किंग्समध्ये गेल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या एका रहस्यमय पोस्टमुळे रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे.

Published On: 

Mumbai Indians and Nike logo representing the multi-year kit partnership for IPL 2027.

प्रतिनिधी, २६ नोव्हेंबर: आगामी आयपीएल हंगामात हार्दिक पांड्या पंजाब किंग्सकडून खेळणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाबाबत सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. आयपीएल २०२७ च्या तयारीदरम्यान मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या एका रहस्यमय पोस्टमुळे चाहत्यांमध्ये रोहित शर्माच्या पुनरागमनाची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

फ्रँचायझीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला असून, त्यामध्ये एका हातात मुंबई इंडियन्सची कॅप दिसत आहे. या फोटोत कोणत्याही खेळाडूचा चेहरा दिसत नसला तरी, टोपी धरण्याच्या शैलीमुळे चाहत्यांना फ्रँचायझीच्या यशस्वी काळाची आठवण झाली आहे. हा फोटो मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या पुनरागमनाचा संकेत असल्याचा विश्वास चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदासाठी सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा या नावांवरही चर्चा झाली होती. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, तिलक वर्मालाही संभाव्य पर्याय म्हणून पाहिले जात होते. मात्र, आता समोर आलेल्या माहितीनुसार मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाने पुन्हा एकदा रोहित शर्माशी संपर्क साधला असून, त्याने कर्णधारपद स्वीकारण्यास सहमती दर्शवली आहे.

सध्या मुंबई इंडियन्सची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. फ्रँचायझीने अद्याप कर्णधाराच्या नावाची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष मुंबई इंडियन्सच्या पुढील अधिकृत घोषणेकडे लागले असून, त्यानंतरच या सर्व अटकळांना पूर्णविराम मिळू शकणार आहे.

📌 महत्त्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही